JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'खोके सरकारने आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला', आदित्य ठाकरेंचा प्रहार

'खोके सरकारने आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला', आदित्य ठाकरेंचा प्रहार

टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यावरून आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 ऑक्टोबर : महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर आता टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप होत आहे. या मुद्द्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, असा प्रहार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. ‘टाटा एअरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो, पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, हे तर दिसतच आहे. आता 4 प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. उदय सामंत यांचं प्रत्युत्तर दरम्यान टाटा-एअरबस प्रकल्पावरून होत असलेल्या आरोपांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘विरोधक टीका करण्यापलीकडे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापलीकडे काहीही करत नाहीत. 21 सप्टेंबर 2021 ला याचा एमओयू केंद्र सरकारने केला होता. एका वर्षापूर्वीच हा प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय कंपनीने आणि संबंधित यंत्रणांनी घेतला होता, तरीदेखील आम्ही प्रयत्न करू, असं मी सांगितलं होतं’, असं उदय सामंत म्हणाले आहेत. ‘एका वर्षापूर्वीच जो प्रकल्प गुजरातला जायचा निर्णय झाला आहे. शिळ्या कढीला उकळी फोडण्यामध्ये अर्थ नाही. एमओयू झाल्यानंतर मागच्या सरकारचं एकही पत्र उद्योग विभागात सापडलं नाही. सत्तेत असताना ज्यांनी या प्रोजेक्टसाठी प्रयत्न केले नाहीत, त्यांनी युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करण्यात अर्थ नाही. एका वर्षापूर्वीच गेलेला प्रकल्प आता गेला असं सांगून संभ्रम निर्माण करण्यात अर्थ नाही,’ असं प्रत्युत्तर उदय सामंत यांनी दिलं आहे. काय आहे टाटा-एअरबस C-295 प्रकल्प? 56 विमानांच्या निर्मितीसाठी करार 21 हजार कोटींचा सामंजस्य करार AVRO-748 ची जागा C-295 विमानं घेणार भारत सरकार आणि एअरबसमध्ये करार पहिली 16 विमानं पुढच्या 4 वर्षांमध्ये मिळणार 40 विमानांची निर्मिती करणार टाटा ऍडव्हान्स सिस्टीम निर्मिती करणार एअरबस युरोपमधील विमान निर्मिती कंपनी टाटा एअरबस कंपनी या विमानांची निर्मिती बडोदा इथल्या प्लांटमध्ये करणार आहे. 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी C295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या