JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Success Story: 500 रूपये कमी मिळाल्यानंतर पडली ठिणगी, आता तस्मिया देते हजारोंना नोकरी! Video

Success Story: 500 रूपये कमी मिळाल्यानंतर पडली ठिणगी, आता तस्मिया देते हजारोंना नोकरी! Video

Tasmiya Shaikh : पगारातील 500 रूपये कमी मिळाल्यानंतर हा प्रवास सुरू झाला. त्यानंतरच्या पुढच्या काही वर्षांमध्येच हजारोंना नोकरी देणारी ती स्वत:च ब्रँड बनली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 5 ऑक्टोबर :  वयाची 25-30 वर्ष पूर्ण होईपर्यंत अनेक जण नोकरी मिळवण्याची किंवा व्यवसाय सुरू करून त्यात स्थिरावण्याचे प्रयत्न करत असतात. याच वयातील पुण्याच्या  तास्मिया शेख या तरूणीची गोष्ट अतिशय प्रेरणादायी आहे. तास्मियानं आजवर हजारो गरजू तरूणांना नोकरी मिळवून दिली आहे. पगारातील 500 रूपये कमी मिळाल्यानंतर हा प्रवास सुरू झाला. त्यानंतरच्या पुढच्या काही वर्षांमध्येच ती स्वत:च ब्रँड बनली आहे. 500 रूपये कमी मिळाले आणि… तास्मिया एका मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंबात वाढली आहे. तिच्या घरामध्ये कोणत्याही प्रकाराचा धार्मिक अतिरेक कधीच नव्हता. ’ मी दहावी पास झाले तेव्हा आपण कमावण्याचं काही तरी साधन शोधलं पाहिजे. किमान स्वत:साठी तरी कमवले पाहिजे, असं मला वाटलं. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्यावर आपण स्वत:ला चांगल्या प्रकारे जोखू शकतो. मला स्वत:मध्ये स्पार्क आहे, हे जाणवायचं. तो स्पार्क शोधण्यासाठी मी घराच्या बाहेर पडले. स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोडली नोकरी, प्राध्यापिका बनली यशस्वी उद्योजिका Video मी एका सुशिक्षित मुस्लिम कुटुंबात वाढले या गोष्टीबद्दल मला नेहमीच अभिमान वाटतो. कारण की आमच्या घरांमध्ये कोणत्याही प्रकारे धर्माचा अतिरेक नव्हता त्यामुळे लहानपणापासूनच माझ्या कुटुंबाने मला नेहमी माझ्या विचारांच्या पाठीशी राहून मला पाठबळ दिले. मी अकरावीला असताना एके ठिकाणी ऑफिस असिस्टंट म्हणून पहिल्या नोकरीला सुरुवात केली. माझ्या पगारामध्ये मला पाचशे रुपये कमी मिळाले. मी पूर्ण काम केलंय. त्या कामासाठी सर्वस्व लावून मेहनत केलीय तर आपले पैसे कट करू नये अशी माझी भावना होती. मला ही गोष्ट पटली नाही. मी माझे पैसे परत केले आणि संपूर्ण रकमेची मागणी केली. या प्रसंगातूनच माझ्या मनामध्ये व्यावसायिकतेचं बीज रोवलं गेलं,’ अशी आठवण तस्मियानं सांगितली आहे. कसा सुरू झाला व्यवसाय? तस्मिया तिच्या कंपनीमध्ये काम करत होती. त्या कंपनीमध्ये तिची ग्रोथ होत होती. पण आता आपली यापेक्षा अधिक ग्रोथ होऊ शकत नाही, हे लक्षात आलं आणि तिने व्यवसायत उतरण्याचा निर्णय घेतला. ‘माझ्या डोक्यात अनेक कल्पना होत्या. नोकरी करत असतानाच मी काही व्यवसाय देखील करत होते. त्यामुळे व्यवसायात येणाऱ्या अडचणींची मला जाणीव होती. मी जॉब सोडल्यानंतर दोन लाखाचे कर्ज काढले आणि ‘जॉब फेअर’ या माझ्या आवडत्या कल्पनेवर आधारित व्यवसाय करण्याचे ठरवले. जास्तीत जास्त गरजू उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण कन्सल्टन्सी कंपनी सुरू केली असती तर मी कमी लोकांपर्यंत पोहचू शकले असते,’ असे तस्मिया म्हणाली. Video : अपूर्ण स्वप्नाला मिळाले पतीचे बळ, शून्यातून सुरुवात करत बनली 4 कंपन्यांची मालकीण तस्मियानं नोकरीच्या शोधात असणाऱ्या अधिक तरूणांपर्यंत पोहचण्यासाठी ‘नोकरी महोत्सव’ सुरू केला. या महोत्सवात मी उमेदवाराकडून कोणतेही पैसे घेतले नाहीत. त्यामुळे या महोत्सवाला मोठ्या प्रमणात प्रतिसाद मिळतो. 2019-20 या एकाच वर्षात या महोत्सवाच्या माध्यमातून 1100 जणांना नोकरी दिली. इतरांपेक्षा वेगळा महोत्सव नोकरी महोत्सव देशात सर्वत्र भरतात. पण या सर्व महोत्सवापेक्षा तस्मियाचा नोकरी महोत्सव वेगळा आहे. तो फक्त एका दिवसापुरता मर्यादीत महोत्सव नाही. यामध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना तिचं ट्रेडमार्क ‘जॉब कार्ड’ दिलं जातं. या प्रत्येक कार्डला युनिक नंबर असतो. तो नंबर उमेदवारनं तस्मियाच्या वेबसाईटवर रजिस्टर करून त्याचे शिक्षण, अनुभव ही सर्व बेसिक माहिती वेबसाईटवर अपलोड केली की त्याचे जॉब कार्ड सुरू होते. त्यानंतर त्या उमेदवाराला वर्षातील 365 दिवस रोज सकाळी साडेदहा ते साडे अकराच्या दरम्यान त्याच्या शहरातील योग्य नोकरीच्या संधींची माहिती एसएमएसच्या माध्यमातून दिली जाते. प्रत्येक उमेदवाराला वर्षभरात कमीत कमी 1100 जॉबच्या संधी मिळतात. त्यामुळे या उमेदवारांना जॉब लागण्यास मदत होते. त्याचा कंपनीलाही फायदा होतो, असे तस्मियाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे ही सर्व सेवा उमेदवार किंवा कंपनीकडून कोणताही पैसा न घेता दिली जाते, असे तिने सांगितले. स्वप्न पाहून थांबू नका… ‘माझं काम ही माझी ओळख असली तरीही या कामासाठी लागणारे बुद्धिमत्ता, नेतृत्वक्षमता लोकांच्या तुमचे संवाद साधण्याची कला आणि माझ्यासमोर जेव्हा-जेव्हा असंख्य अडचणी येतात त्या निभावण्याची त्यांच्याशी दोन हात करण्याची क्षमता ही मला माझ्या कामामुळे विकसित झाली. Success Story: घरच्यांना वाटायचं ट्रॅव्हल एजंट म्हणून करतो काम; पठ्ठ्यानं उभी केली 400 कोटींची कंपनी  मला माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीने माझ्यातील वेगळेपणा शोधून स्वतःला घडवण्याची प्रेरणा मिळाली.  तुमच्या नजरेत स्वप्नच असतील तर ती पूर्ण करण्यासाठी आव्हानं देखील समजली पाहिजे. ती स्वप्न फक्त बघायची नसतात तर ती घडवायची देखील असतात. ती घडवण्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये खडतर परिस्थिती होती. माझ्यामध्ये असलेली जिद्द मला स्वस्थ बसू देत नव्हती. या मुळेच आज मी स्वतःचे स्वतःचा व्यवसाय स्वप्नांना जिद्दीची जोड देऊन वाढवत आहे,’ असे तास्मियाने सांगितले. तास्मियाच्या संपर्कसाठी पत्ता तास्मिया शेखला संपर्क करायचा असेल तर तुम्ही Tasmiya.jobshowcase@gmail.com  या इमेल आयडीवर संपर्क करू शकता. http://jobshowcase.in/ या वेबसाईटच्या माध्यमातूनही तुम्ही तिला संपर्क करू शकता. तसेच 8087200019 या मोबाईल नंबरवरही फोन केल्यास ती तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या