JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उद्धव ठाकरेंनंतर शरद पवार सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर, सासवडमध्ये करणार पाहणी

उद्धव ठाकरेंनंतर शरद पवार सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर, सासवडमध्ये करणार पाहणी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा दिवाळीच्या दिवशीच शेताच्या बांधावर पोहोचणार आहे.

जाहिरात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा दिवाळीच्या दिवशीच शेताच्या बांधावर पोहोचणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 24 ऑक्टोबर : राज्यात एकीकडे दिवाळी जल्लोषात साजरी केली जात आहे. तर दुसरीकडे शेतकरी अस्मानी संकटाला तोंड देत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा दिवाळीच्या दिवशीच शेताच्या बांधावर पोहोचणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज हे सासवडमधील परींचे भागात शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या संवाद साधून समस्या जाणून घेणार आहे. त्यानंतर ते तिथे शेतकरी मेळाव्यात 10 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. (‘या सरकारला आता वठणीवर आणा’, बळीराजाने उद्धव ठाकरेंच्या हातात दिला आसूड) दरम्यान, राज्यावर अस्मानी संकट आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी, ‘जर हे सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती नाही, असं हे सरकार म्हणतंय, म्हणून प्रतिकात्मक ही भेट आहे. खरं काय आणि खोटं काय हे सरकारला कळू द्या. रेशन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. जो शिधा सरकार वाटत आहे, ते धान्य हे शेतकऱ्यांकडूनच आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे, 50 हजार हेक्टरी मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. (शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत मिळालीच पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी) पंचनामे कधी करणार, तोपर्यंत शेतकऱ्यांचे हाल होऊन जातात. पंचनामे होईल, तेव्हा होईल. पण ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत मिळालीच पाहिजे, असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या