JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune : तिसरीतल्या संस्कारची कमाल! स्त्रोत पठणाचा केला वर्ल्ड रेकॉर्ड, Video

Pune : तिसरीतल्या संस्कारची कमाल! स्त्रोत पठणाचा केला वर्ल्ड रेकॉर्ड, Video

पुण्यातील संस्कार खटावकरने अवघ्या पाच मिनिटे आणि ५१ सेकंदात शिवतांडव व महिषासुरमर्दिनी स्तोत्र पठणाचा विश्वविक्रम केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे 11 नोव्हेंबर : संस्कृत सारखी अवघड भाषा भल्या भल्यानं जमत नाही. त्यातील विविध स्तोत्र ऋचा योग्य उच्चार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मात्र, पुण्यातील तिसरीमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्या संस्कार खटावकरने अवघ्या पाच मिनिटे आणि ५१ सेकंदात शिवतांडव व महिषासुरमर्दिनी स्तोत्र पठणाचा विश्वविक्रम केला आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याच्या या कामगिरीची नोंद झाली आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद  पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न प्री-प्रायमरी स्कूल मध्ये तिसरीत शिकणाऱ्या संस्कारने नुकतीच ही विक्रमी कामगिरी केली. त्याच्या या विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यामध्ये घेण्यात आली आहे. महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् तीन मिनिटे सात सेकंदात पठण करीत त्याने केरळच्या मुलीचा तीन मिनिटे ४४ सेकंदाचा विक्रम मोडला आहे.

Solapur : 17 वर्षांचा तरूण करतोय वर्ल्ड रेकॉर्डची तयारी, यापूर्वी झालीय गिनीज बुकमध्ये नोंद, Video

गेली तीन वर्षे केली तयारी  महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् आणि शिवतांडव स्तोत्र बोलण्यास कठीण आहेत. मात्र, आम्ही गेली तीन वर्षे तयारी करत होतो. कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे आम्हाला अधिक वेळ मिळाला. त्याची आई मोनिका ऋषिकेश खटावकर यांनीही त्याचे चांगले पाठांतर करून घेतले, असं संस्कारचे वडील ऋषिकेश खटावकर यांनी सांगितले . शिवतांडव व महिषासुरमर्दिनी स्तोत्र वेगात पठणाचा केला सराव  लॉकडाऊनच्या काळात संस्कारला काही तरी शिकवायच्या उद्देशाने आम्ही काही स्तोत्र शिकवायला सुरुवात केली आणि त्याने खूपच लवकर ही स्तोत्र आत्मसात केली. एवढचं नाही तर शिवतांडव व महिषासुरमर्दिनी स्तोत्र वेगात पठणाचा त्याने सराव केला. स्पष्ट संस्कृतचे उच्चार त्याने म्हणून जागतिक पातळीवर पाच मिनिटे आणि ५१ सेकंदात शिवतांडव व महिषासुरमर्दिनी स्तोत्र पठणाचा विश्वविक्रम केला आहे, असं संस्कारची  आई मोनिका ऋषिकेश खटावकर यांनी सांगितले आहे.  

ऋषिकेश रिकामे : जादुई आवाजाचा तरुण कसा बनला सोशल मीडियावर स्टार? पाहा Video

संबंधित बातम्या

मला ही स्तोत्र म्हणायला आवडतात आणि आई वडिलांनी माझ्याकडून चांगली तयारी करून घेतली होती. मला भविष्यात अभिनय क्षेत्रात काम करायला आवडेल. महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् तीन मिनिटे सात सेकंदात पठण करीत मी केरळच्या मुलीचा तीन मिनिटे ४४ सेकंदाचा विक्रम मोडला,असं संस्कार खटावकरने सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गौरव संस्कारने केलेल्या कामगिरीबाबत नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा गौरव केला आहे.  मंत्रालयात झालेल्या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांनी संस्कारचा सत्कार करत त्याच्या विक्रमाचे कौतुक केले. प्रसंगी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्यासह संस्कारचे वडील ऋषिकेश खटावकर आदी उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या