पुणे, 11 ऑक्टोंबर : शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथील पहिले भूमिगत स्टेशनचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि पुण्याच्या इतिहासाची साक्ष हे स्टेशन देणार आहे. छत्रपती शिवकालीन- किल्ल्याचे स्वरूप मेट्रोच्या या स्टेशनला दिले जाणार आहे. यासोबतच या स्टेशन पासूनच्या अंतरंग आणि बाह्य भागांमध्ये पूर्वीच्या जुन्या पुण्यामधील वाड्यांची संरचना, तुळशी वृंदावन, देशी झाडे आदी गोष्ट देखील असणार आहेत. यामुळे पुण्याचा पुरातन वारसा पुन्हा एकदा मेट्रो स्टेशनच्या रूपाने आपल्याला अनुभवायला मिळेल, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्यात येणार पुढे बोलताना ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन असे या स्टेशनचे नाव असेल. ऐतिहासिक वारसा या स्टेशनवर आपल्याला दिसेल. शिवाजीनगर मेट्रो स्टेशन हे पुण्यातील पाहिले भूमिगत मेट्रो स्टेशन आहे. हे स्टेशन मेट्रो स्टेशन मल्टी-मॉडल इंटिग्रेशनसह नियोजित आहे. स्थानकांचे प्रवेश निर्गमन हे शिवाजी नगर रेल्वे स्थानक, PMPML आणि MSRTC बस डेपो आणि हिंजवडी मेट्रो मार्गासह एकत्रित केला आहे. शिवाजी नगर भूमिगत स्टेशन हे मुख्य रस्त्यापासून 200 मीटर अंतरावर आहे आणि साखर संकुल ते आकाशवाणी भवनला जोडणाऱ्या रस्त्याखाली आहे. स्टेशनशी संबंधित इमारती रस्त्याच्या पातळीवर 200X20 मीटर परिसरात येत आहेत. आकाशवाणी पुणे आणि शिवाजी नगर रेल्वे स्टेशन येथे जुना मुंबई-पुणे महामार्ग जोडण्यासाठी पादचारी भुयारी मार्ग नेटवर्क मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी दोन भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. एक भुयारी मार्ग शिवाजी नगर रेल्वे स्थानकाकडे जातो आणि दुसरा डॉ कपोते जंक्शन येथे प्रवेश निगमन बदलण्यासाठी जातो. हेही वाचा : Video: आईचा हात धरून रस्त्यावरुन चाललेला अरद; मागून दुचाकी आली अन्…, वाढदिवशीच घडलं भयानक पाच भूमिगत स्थानके नियोजित शिवाजी नगर मेट्रो स्थानकात 5 लिफ्ट असतील ज्यात 3 लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत आणि 12 एस्केलेटर त्यापैकी 6 बसवण्यात आले आहेत. टनेल व्हेंटिलेशन आणि environmental control system या शेवटच्या टप्प्यात असून कमिशिनिंग साठी तयार आहेत. शिवाजी नगर येथील रस्ते आणि वाहतूक जंक्शन्सना आधुनिक रूप देऊन पुनर्रचना करण्यात येणार आहे.
महा मेट्रो पुण्यात सुमारे 30 किमी लांबीचे दोन मेट्रो कॉरिडॉर बांधत आहे. कॉरिडॉर-1 (उत्तर-दक्षिण कॉरिडॉर) हा PCMC ते स्वारगेटपर्यंत सुरू होतो आणि कॉरिडॉर-2 (पूर्व-पश्चिम कॉरिडॉर) वनाझ ते रामवाडीपर्यंत 24 किमी उन्नत आणि 5 किमी भूमिगत स्थानकांसह सुरू होतो. प्रकल्पासाठी दोन डेपो नियोजित आहेत, त्यापैकी एक रेंज हिलजवळ आहे आणि दुसरा वनाझ स्टेशनवर आहे. भुयारी मार्ग कॉरिडॉर-1 चा भाग आहे आणि रेंज हिल डेपोपासून स्वारगेटच्या दिशेने सुरू होतो. शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी एकूण पाच भूमिगत स्थानके नियोजित आहेत, असेही दीक्षित यांनी सांगितले.