JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : पुण्यातील नवले पुल का झालाय मृत्यूचा सापळा? स्थानिकांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

Video : पुण्यातील नवले पुल का झालाय मृत्यूचा सापळा? स्थानिकांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

पुण्यातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात एकुण 48 वाहनांचे नुकसान झाले आहे.

जाहिरात

पुण्यातील नवले पुल का झालाय मृत्यूचा सापळा?

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 20 नोव्हेंबर : पुण्यातील नवले ब्रिजवर रविवारी झालेल्या साखळी अपघताने पुणेकरांच्या हृदयाची धडधड काही क्षणासाठी थांबवली होती. एका भरधाव टँकरने एकदोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने हा अफघात झाल्याचे समोर आले होते. मात्र, या पुलावरील हा काही पहिलाच अपघात नाही. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार 2012 पासून या ठिकाणी 93 च्या आसपास अपघात झाले आहेत. यासाठी ब्लॅक स्पॉट कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे. याच संदर्भात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी स्थानिकांशी संवाद साधला आहे. काय आहे घटना? पुणे शहरातील कायम व्यस्त असलेल्या नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात एकुण 48 वाहने समाविष्ट असल्याचे समजले आहे. यामध्ये किमान 10 लोक जमीख झाले होते. गर्दीच्याच वेळी नवले पुलावर ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला होता. का होतायेत नवले पुलावर अफघात? स्थानिकांनी सांगितलं महत्त्वाचं कारण..

नवले पुल झालाय अपघाताचा सापळा नवले पुलावर झालेला हा काही पहिला अपघात नाही. यापूर्वीही अनेकदा असे अपघात घडले आहे. अपघात झाल्यानंतर प्रशासनाकडे यावर तोडगा काढण्याची मागणी करुनही यावर अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे या पुलावर वारंवार अपघात होत आहेत. आता तरी प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न या निमित्ताने पुणेकर विचारू लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या