JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यातील मानाच्या गणपतींना मुस्लीम बांधवांकडून अभिवादन, पाहा VIDEO

पुण्यातील मानाच्या गणपतींना मुस्लीम बांधवांकडून अभिवादन, पाहा VIDEO

Pune Ganesh Visrajan: पुण्यातील मानाच्या गणपतींना मुस्लीम बांधवांनी पारंपारिक पद्धतीनं अभिवादन केले. गेल्या 17 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 9 सप्टेंबर : दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीच्या दिवशी होत आहे. गेली दहा दिवस ज्याची मनोभावे सेवा केली त्याला आता अत्यंत भावुक वातावरणात निरोप दिला जात आहे. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’, बाप्पा निघाले गावाला… चैन पडेना आम्हाला’ या सारख्या घोषणा देत गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक (Pune Ganesh Visrjan) हे सर्वांचे आकर्षण असते. ही मिरवणूक पाहण्यासाठी जगभरातील भाविक गर्दी करतात. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर यंदा जल्लोषात मिरवणूक निघालीय.  पुण्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर विसर्जनाची धूम आहे. गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात मुस्लीम बांधव देखील मागे नाहीत. पुण्यातील मानाच्या गणपतींना मुस्लीम बांधवांनी पारंपारिक पद्धतीनं अभिवादन केले. विसर्जन मिरवणूक बेलबाग चौकात आली तेव्हा मानाच्या पाचही गणपती मंडळाच्या अध्यक्षांचा शाल, पुष्पगुच्छ आणि अत्तर लावून पारंपरिक पद्धतीने मुस्लिम औकाफ वेलफेअर ट्रस्टतर्फे बाप्पाचे स्वागत करण्यात आले. पुण्याच्या या बाप्पाने केली कमाल, दोन विरोधक आले एकत्र; नेमकं काय घडलं? मुस्लीम वेलफेर ट्रस्टचे कार्याध्यक्ष मुश्ताक पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गेली 17 वर्ष हा उपक्रम सुरू आहे. पुणे शहरातील धार्मिक सौहार्द कायम राहावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक शांततेने पार पाडावी म्हणून अहोरात्र बंदोबस्तावर असणारे पोलिस कर्मचारी, डॉक्टर, पुणे म.न.पा चे कर्मचारी, विद्युत पुरवठा कर्मचारी व इतर सर्व उपस्थित बांधवांना अतिशय चविष्ठ असे शिरखुर्मा आणि सुका मेवाचे वाटप देखील करण्यात येणार आहे,’ अशी माहिती शेख यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या