JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune: आले अपंगत्व तरी हरली नाही जिद्द! बाप्पाच्या आशीर्वादानं उभा केला संसार, VIDEO

Pune: आले अपंगत्व तरी हरली नाही जिद्द! बाप्पाच्या आशीर्वादानं उभा केला संसार, VIDEO

गणपती बाप्पा (Ganpati Bappa) आपली सर्व विघ्न दूर करतो. तो सुखकर्ता आणि दुखहर्ता आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पुण्यातील हेमंद सांगवेकर यांना याचीच अनुभूती आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 23 ऑगस्ट :  गणपती बाप्पाच्या आगमानाचे वेध (Ganesh Chaturathi 2022) आता सर्वांना लागले आहेत.  लंबोदर, विनायक, वक्रतुंड अशी गणपतीची अनेक नावं प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर गणपतीला विघ्नहर्ता असंही म्हंटलं जातं. बाप्पा आपली सर्व विघ्न दूर करतो. तो सुखकर्ता आणि दुखहर्ता आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पुण्यातील हेमंत सांगवेकर यांना याचीच अनुभूती आली आहे. गणपती बाप्पामुळेच त्यांना आयुष्यातील मोठ्या संकटातून बाहेर पडता आले आहे. अचानक आले अपंगत्व हेमंत सांगवेकर 15-16 वर्षांपूर्वी  महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. सिव्हिल इंजिनिअरचं शिक्षण आणि कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय या दोन्ही जबाबादारी पार पाडत असताना साईटवर त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये  हेमंत यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली. आणि या दुखापतीमध्ये त्यांचा एक पाय डॉक्टरांना काढावा लागला. या अपघातामुळे हेमंत यांच्या आयुष्याची घडी विस्कटली. त्यांना व्यवसायात मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. त्यांचे कर्जही वाढले होते. या अतिशय निराशाच्या काळामध्ये त्यांना काय करावे सुचत नव्हते. अचानक आलेला अपंगत्व आणि कर्जबाजारीपणा या दुष्टचक्रातून त्यांची त्यांची सुटकाच होत नव्हती. याच कालावधीमध्ये गणेशोत्सवाच्या जवळ आला. त्यामध्ये हेमंत यांनी एक छोटा गणेश मूर्ती विकण्याचा स्टॉल टाकला. या स्टॉलमधून त्यांना त्यावेळेस 1800 रुपये एवढी कमाई झाली.  या कमाईचा त्यांनी पुढील व्यवसायासाठी भांडवल म्हणून वापर केला. या भांडवलावर त्यांनी एक ठिकाणी भेळेची गाडी टाकली आणि पुढे तो व्यवसाय चालू केला. तर दुसरीकडे त्यांनी गणेश उत्सवामध्ये मूर्ती तयार करून विकण्याचा नवा व्यवसाय देखील सुरू केला. यासोबतच त्यांनी संपूर्ण वर्षभर चालतील असे विविध पूरक व्यवसाय सुरू केले. गणपतीच्या जन्माच्या पुराणात आहेत 2 कथा, तुम्हाला माहीत आहे का? हेमंत या अनुभवाबद्दल सांगतात की, ‘मी त्या वाईट कालखंडामध्ये गणेशमूर्ती विकण्याचा व्यवसाय सुरू केला नसता तर कदाचित मला आणखी वाईट दिवस पाहावे लागले असते. बाप्पाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव असल्यानं देवाने मला माझ्या या व्यवसायात भरभरून साथ दिली.  आता मला वर्षभर या व्यवसायात फायदा होतो. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये मी असंख्य गणेश मूर्ती बनवून विकतो. त्याचबरोबर वर्षभरामध्ये दिवाळी होळी अशा विविध सगळ्यांना लागणाऱ्या वस्तूंचा पूरक व्यवसाय म्हणून देखील मी सध्या करत आहे. तसेच मी पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य देखील विकतो. मला वर्षभरामध्ये देवाच्या कृपेने कोणत्याही गोष्टीचा कमी भासत नाही. या व्यवसायामध्ये माझी पत्नी पोलिओग्रस्त आहे हर्षदाची मोलाची साथ आहे. तर माझी आई देखील मला माझ्या सर्व कामांमध्ये मोठी मदत करते.’ थोडक्यात काय तर बाप्पाच्या आशीर्वादानंच हेमंत यांचा संसार पुन्हा उभा झाला आहे. आज ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले आहेत.

गुगल मॅप वरून साभार

संबंधित बातम्या

हेमंत सांगवेकर यांचा पत्ता : विश्रांतवाडी, कॉमर्स झोन रस्ता, सेंट अनोथॉनी चर्च जवळ सुगंधालय, प्लॉट नंबर 69. फोन नंबर  +91 83901 95844

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या