JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune Crime : रेकी करून दरोडा टाकणाऱ्या बंटी, बबलीचे भयानक कृत्य, पुण्यातील घटनेने खळबळ

Pune Crime : रेकी करून दरोडा टाकणाऱ्या बंटी, बबलीचे भयानक कृत्य, पुण्यातील घटनेने खळबळ

पुणे पोलीसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी पेशाने व्यवसायीक आणि वकील करोडीपती बंटी बबलीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 10 नोव्हेंबर : पुणे पोलीसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी पेशाने व्यवसायीक आणि वकील करोडीपती बंटी बबलीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे शहरात अनेकांना गंडा घालत पोलिसांना चकमा देणाऱ्या बंटी बबलीवर मोठी कारवाई केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोकांच्या घरातील लक्ष्मी लंपास करणाऱ्या करोडपती बंटी बबलीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात बंटी बबलींनी हातचलाखी करून लुटण्याचा धुमाकूळ घातला होता. तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोकांच्या घरातील लक्ष्मी लंपास करणाऱ्या करोडपती बंटी बबलीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील पुरुष आरोपी हॉटेल व्यवसायिक आहे तर त्याची साथीदार असलेल्या महिलेनं वकिलीचे शिक्षण घेतल आहे. मूळचा अमरावतीचा असलेला राजीव काळमे आणि त्याची मेहुणी सोनिया पाटील या दोघांना अलंकार पोलिसांनी मुद्देमालासह बेड्या ठोकल्या आहेत.

हे ही वाचा :  मुंबईत पुन्हा 26/11 सारख्या हल्ल्याची शक्यता, ड्रोनसह छोट्या विमानांतून दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत

संबंधित बातम्या

कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या जयंत इनामदार यांच्या बंगल्यात 26 नोव्हेंबर रोजी घरफोडी झाली होती. चोरट्यांनी हिऱ्यांच्या दागिन्यासह तब्बल 98 लाखांचा मौल्यवान ऐवज लंपास केला होता. ही चोरी उघडकीस येऊ नये याची पुरेशी खबरदारी चोरट्यानी घेतली होती. असे असताना पोलिसांनी तब्बल 100 पेक्षा जास्त ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करून तपासले आणि त्यातून ही जोडी पोलिसांच्या हाती लागली.

जाहिरात

हे ही वाचा :  कुटुंबाचं हादरवणारं पाऊल; या कारणामुळे एकाच घरातील 6 जणांनी घेतलं विष

आश्चर्याची बाब म्हणजे घरफोडी करण्याच्या आधी ही जोडी फॉर्च्यूनर गाडीतून परिसराची रेकी करायचे आणि त्यानंतर बंद असलेल्या घरात प्रवेश करून डाव साधायचे परंतु पुणे पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केल्याने पुणे पोलिसांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या