पुणे, 01 नोव्हेंबर : पुण्यातील बिबवेवाडी येथील एका वास्तुशास्त्र सल्लागाराचा खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. वास्तशास्त्र सल्लागार हा नेहमी अंगावर भरपूर सोन्याचे दागीने घालत होता या सोन्यावर डल्ला मारण्यासाठी त्याच्याच मित्रानी खून केल्याची माहिती समोर आली आहे. दागिन्यांच्या लालसेने कॉफीतून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध झाल्यावर गळा दाबून वास्तुशास्त्र सल्लागाराचा खून करण्यात आला. दरम्यान याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, पुण्यातील बिबवेवाडी येथील वास्तुशास्त्र सल्लागार नेहमी अगांवर भरपूर दागिने घालत होता. दरम्यन याचाच फायदा घेत. या दागिन्यांच्या लालसेने मित्रांनीच गुंगीचे औषध पाजून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी रूपाली रूपेश वरघडे यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. नीलेश वरघडे हे वास्तुशास्त्र सल्लागार होते त्यांना अंगावर भरपूर सोने परिधान करण्याची सवय होती. या सोन्यावर त्यांचे मित्र दिपक नरळे आणि रणजित जगदाळे यांचा डोळा होता. यातूनच त्यांनी खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
हे ही वाचा : बहिणीच्या लग्नाचं कर्ज कसं फेडायचं? 20 वर्षीय शेतकरी भावाने केली आत्महत्या
मेडिकल दुकानाची पूजा करण्याच्या बहाण्याने दीपकने नीलेश यांना नऱ्हे येथे नेले. कॉफी घेऊया असा बनाव करत कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. यानंतर त्याचा गळा दाबून खून करत अंगावरील दागिने आणि पाकीट, मोबाइल काढून घेतले. त्यांनी नीलेशचा मृतदेह पोत्यात गुंडाळून तो नीरा नदीत फेकून दिला. याबाबत वरघडे यांच्या पत्निला संशय आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती.
यावरून पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज चेक केले. वरघडे यांचे मित्र काही संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले. नराळे आणि जगदाळे हे दोघे मृतदेह नेतानाचे चित्रन पोलिसांना मिळाले होते. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दीपक आणि त्याचे साथीदार नीलेशचा मृतदेह घेऊन जाताना दिसले. यावरून पोलिसांनी तपास यंत्रणेला वेग देत तपासणी सुरू केली.
हे ही वाचा : वीज पुरवठा खंडीत होताच 20 वर्षीय मुलाचा खून, कोल्हापुरातल्या घटनेने खळबळ
मात्र, याबाबत दोघा आरोपींकडे वारंवार विचारना करूनही ते नकार देत होते. यावर पुणे पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्हा कबूल केला. नीलेशच्या अंगावरील दागिन्यांसाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले. पोलिसांनी कार, सोन्याचे दागिने आणि मोबाइल असा 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान नदीत फेकलेला नीलेशचा मृतदेह अद्यापही सापडला नसल्याने शोध सुरू आहे.