JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune : केमिकल कंपनीला भीषण आगीचा भयंकर Video; अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल

Pune : केमिकल कंपनीला भीषण आगीचा भयंकर Video; अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल

आगीमुळे निर्माण झालेल्या प्रचंड धुराचे लोट पसरत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना श्वास घातला त्रास होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 7 एप्रिल : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad News) शहरातील मोशी परिसरात असलेल्या एका कंपनीला भीषण आग (Fire) लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची तीव्रता एवढी भीषण होती की सुमारे 25 ते 30 बंबाद्वारे पाणी टाकल्यानंतरही ही आग आटोक्यात आली नाही. या घटनेचा एका व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आगीचे लोट दिसत आहेत. या आगीत मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यात केमिकल कंपनी असल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास जाणवत आहे. दरम्यान अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितनुसार ही आग झाडू आणि खराटे बनविणा-या एस. के. ब्रूम कंपनीला लागली असून कंपनीत आलेल्या शेकडो केमिकल ड्रमने देखील पेट घेतल्याने आग अधिक भडकली. आग लागण्याच नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. या आगीत कोट्यवधीच्या मालमत्तेचे नुकसान झालं आहे. हे ही वाचा- पुणे जिल्ह्यात पुष्पा गँगचा धुमाकूळ, शस्त्रांचा धाक दाखवत चंदनाचे झाड केले गायब सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाल्याचा प्रकार समोर आलेला नाही. मागील सहा तासांपासून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

संबंधित बातम्या

तर आगीमुळे निर्माण झालेल्या प्रचंड धुराचे लोट पसरत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना श्वास घातला त्रास होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या