JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune Crime : रिक्षाचालकाकडून 17 वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, विरोध करताच आरोपीने घेतला मुलीच्या गळ्याचा चावा, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime : रिक्षाचालकाकडून 17 वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, विरोध करताच आरोपीने घेतला मुलीच्या गळ्याचा चावा, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime news: महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रिक्षातून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात

Shocking! पुण्यात तरुणीवर बळजबरीचा प्रयत्न; विरोध करताच आरोपी रिक्षाचालकाने मुलीच्या गळ्याचा घेतला चावा (प्रातिनिधिक फोटो)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 7 जून : तरुणी, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. ट्युशन संपल्यानंतर रिक्षाने घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा रिक्षाचालकाने विनयभंग (minor girl molested by auto driver) केला आहे. ही धक्कादायक घटना पुण्यात (Pune) घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना 4 जूनच्या रात्री घडली आहे. एक 17 वर्षीय मुलगी ट्युशन संपल्यानंतर आपल्या घराकडे जाण्यासाठी रिक्षाने निघाली होती. त्यावेळी आरोपी रिक्षाचालकाने या मुलीला घेऊन रिक्षा एका निर्जनस्थळी नेली. यानंतर रिक्षाचालकाने कथितपणे या मुलीला घट्ट मिठी मारली. त्यावेळी पीडित मुलीने त्याला जोरदार विरोध केला. यावेळी संतापलेल्या रिक्षाचालकाने पीडित मुलीच्या गळ्याचा चावा घेतला आणि तिचा विनयभंग केला. यावेळी पीडित मुलीने जोरदार आरडाओरड करण्यास सुरुवात केली. पीडित मुलीचा आवाज ऐकून काही वाटसरुंनी मदतीसाठी धाव घेतली. यानंतर आरोपी रिक्षाचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. वाचा :  CCTV: पुण्यातील सराफाला पाण्याची बाटली पडली 30 लाखांना, STतून उतरताच घडला भयंकर प्रकार या घटनेनंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या घरी सांगितला. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात कलम 354, 354 (अ), 354 (ब) आणि 323 तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला पकडण्यासाठी टीम तयार केली आहे. ज्या परिसरातून पीडित मुलीने रिक्षा घेतली आणि ज्या परिसरात ही घटना घडली त्या परिसरात असलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आपला तपास करत आहेत. तसेच आरोपीची ओळख पटवून लवकरात लवकर त्याला मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करत आहेत. शिरूरमध्ये पत्नी आणि सासूवर जावयाचा गोळीबार पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिरूर येथे न्यायालयाच्या परिसरात माय-लेकींवर गोळीबार झाला आहे. भरदिवसा न्याायलयाच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या गोळीबारात आरोपीच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सासू गंभीर जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या