JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पाऊस आला धो..धो..धो! पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! सर्व शाळांना सुट्टी जाहीर

पाऊस आला धो..धो..धो! पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! सर्व शाळांना सुट्टी जाहीर

पुणे महानगरपालिकेकडून (Pune MNC) एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जुलै:  जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात संथ गतीने येणाऱ्या मान्सूनने  आता राज्याच्या सर्वच भागात हजेरी लावली आहे. आधी काहीसा संथ आणि कमी पडणारा पाऊस आता मुसळधार (Heavy rain in Maharashtra) पडू लागला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये अति मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अनेक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. त्यात आता हवामान विभागानं पुणे, काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट (Red Alert in Maharashtra) जरी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुणे महानगरपालिकेकडून (Pune MNC) एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या म्हणजेच 14 जुलै 2022 ला सर्व वर्गांच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. एक परिपत्रक काढून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. जॉब शोधताना सततच्या रिजेक्शनमुळे कंटाळा आलाय? चिंता नको; या टीप्समुळे मिळेल Job पुणे महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून अतिवृत्षटी होण्याची शक्‍यता हवामान खात्यामार्फत त्यानुषंगाने पुणे महानगरपालिका वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे  बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व मनपा खाजगी शाळांना अनुदानित, विना अनुदानित, अंशत; अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित इत्यादी शाळांना 14 जुलै 2022 ला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती परिपत्रीकद्वारे देण्यात आली आहे. तसंच  प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषगांने शाळेत उपस्थित राहतील अशा सूचना महापालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत. प्राध्यापकांनो, नोकरी हवीये? मग परीक्षा देण्याची गरज नाही; थेट द्या Interview पुढचे दोन दिवस 5 जिल्हांना रेड अलर्ट पाच जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट (Red Alert in five District) जारी केला आहे. यात पालघर, रायगड, नाशिक, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या