पुणे तापमान
पुणे, 3 सप्टेंबर : राज्यात काही ठिकाणी कडाक्याचे ऊन जाणवते आहे. त्यात आता पुण्यात काही दिवसाच्या तापमानान वाढ होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. शुक्रवारी दिवसभरात पुणे शहर परिसरात 33.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. यावरुन हवामान खात्याने आता शहरातील दिवसाचे तापमान उच्च पातळीवर राहणार, अशी शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने काय म्हटले - यासोबतच हवामान खात्याने पुण्यातील पावसाबाबतही अंदाज व्यक्त केला आहे. येत्या काही दिवसांत शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा 5.1 अंश सेल्सिअस अधिक होते. तर रात्रीचे तापमान 22.4 अंश सेल्सिअस हे सामान्यापेक्षा 1.3 अंश सेल्सिअस जास्त होते, अशी माहिती हवामान खात्याने दिली आह. पुढील काही दिवसांत दिवसाचे तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर 4 सप्टेंबरपर्यंत शहरातील दिवसाचे तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयएमडी पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. तर दुपारपर्यंत अंशतः ढगाळ वातावरण राहील, असे सांगत या आठवड्याच्या अखेरीपर्यंत शहरात हलका पाऊस पडेल, असे अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी; वाचा, काय आहे महत्त्वाचं कारण? पुढील काही तास महत्त्वाचे - राज्यात रायगडपासून गोवा, कर्नाटक आणि केरळपर्यंतच्या घाट क्षेत्रांवर मेघगर्जनेचे ढग दाटून आलेले आहेत. त्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे आहेत. रायगडपासून मध्य महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक तसेच केरळच्या काही भागांतही हीच स्थिती राहणार आहे, अशी माहिती हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे.