नवी दिल्ली, 6 मे : शुक्रवारी महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हवामान स्वच्छ राहिलं. मात्र, पुढील काही दिवस आकाशात ढगाळ वातावरण आणि उन्हाचा खेळ सुरूच राहणार (Maharashtra Weather Forecast) आहे. दरम्यान, राज्यातील तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी नोंदवलं जात आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या विविध भागात उष्णतेची लाट येऊ शकते. 6 ते 9 मे दरम्यान नागपूरसह अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला (Maharashtra Weather Update) आहे. याशिवाय, बहुतांश शहरांमध्ये महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक ते मध्यम श्रेणीत नोंदवला जात आहे. जाणून घेऊया, शुक्रवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसं असेल.. हे ही वाचा- Maharashtra Weather Update: पुढील 5 दिवसांत विदर्भ आणखी तापणार; पुण्यातील तापमानाने गाठला उच्चांक मुंबई शुक्रवारी मुंबईत कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहिलं. हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 105 वर नोंदवलं गेलं. पुणे पुण्यात कमाल तापमान 40 आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहिलं. येथेही हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 164 नोंदवला गेला. नागपूर नागपुरात कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा राहिलं. हलके ढगही होते. हवा गुणवत्ता निर्देशांक 142 आहे, जो ‘मध्यम’ श्रेणीत येतो. नाशिक नाशिकमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहिलं. हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीतील 107 आहे. औरंगाबाद औरंगाबादमध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश निरभ्र राहिलं. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीतील 109 आहे.