Home /News /pune /

Maharashtra Weather Update: पुढील 5 दिवसांत विदर्भ आणखी तापणार; पुण्यातील तापमानाने गाठला उच्चांक

Maharashtra Weather Update: पुढील 5 दिवसांत विदर्भ आणखी तापणार; पुण्यातील तापमानाने गाठला उच्चांक

पुढील 5 दिवसांत विदर्भ, राजस्थान आणि मध्य प्रदेश; तर 27-30 एप्रिल दरम्यान उत्तर प्रदेश, झारखंड, अंतर्गत गंगा पश्चिम बंगाल आणि ओडिशात उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे, असा अदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) दिला आहे.

    मुंबई, 27 एप्रिल: पुढील 5 दिवसांत पूर्व, मध्य आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेची (Heat Wave in India) स्थिती दिसणार आहे. यामुळे पुढील 5 दिवसांत विदर्भ, राजस्थान आणि मध्य प्रदेश; तर 27-30 एप्रिल दरम्यान उत्तर प्रदेश, झारखंड, अंतर्गत गंगा पश्चिम बंगाल आणि ओडिशात उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) दिला आहे. पुण्यातील तापमानाचा उच्चांक गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला असून प्रचंड उकाडा वाढला आहे. मार्च महिन्यापासून राज्यातील तापमानाने उच्चांक गाठला असून नागरिकांच्या अंगाची लाही लाही झाली आहे. उष्णतेचा (Heat Wave in Maharashtra) हा वाढता पारा अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. याचदरम्यान आता हवामान खात्याने आणखी एक इशारा दिला आहे. पुढील 5 दिवसांत विदर्भ, राजस्थान आणि मध्य प्रदेश; 27-30 एप्रिल दरम्यान उत्तर प्रदेश, झारखंड, अंतर्गत गंगा पश्चिम बंगाल आणि ओडिशात उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. पुण्याबाबत विचार केला तर एप्रिल महिना पुण्यातील लोकांना अक्षरश: भाजून काढतो आहे, असे चित्र आहे. पुण्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. शिवाजीनगर येथे 40.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर रात्रीच्या तापमानातही झपाट्याने वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत पुण्यात पावसाची शक्यता नाही. पुढील काही तास अंशतः ढगाळ वातावरण राहील, त्यानंतर आकाश निरभ्र होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. अनेक जिल्ह्याचे तापमान 45 डिग्रीच्या पुढे - गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, हा आठवडा सुरू होताच सुरू पुन्हा तापायला लागला असल्याने अनेक जिल्ह्याचे तापमान 45 डिग्रीच्या पुढे गेले आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने आता कुलर देखील उपयोगाचे नसल्याचं दिसत आहे. तापमान वाढीमुळे दुपारी रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. हेही वाचा - "पेट्रोल, डिझेलवरील कर केंद्राने कमी केला पण..." महाराष्ट्राचा उल्लेख करत मोदींनी म्हटलं... तज्ज्ञांचे आवाहन - पुढील काही दिवस सूर्याचा प्रकोप कायम राहणार असल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दुपारच्या वेळेस तापमान सर्वाधिक असल्याने नागरिकांनी दुपारी उन्हात निघणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IMD, Maharashtra News, Pune, Rise in temperatures

    पुढील बातम्या