JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यात शिंदे गट करणार धमाका; मनसे, राष्ट्रवादीचे अनेक नेते लागले गळाला?

पुण्यात शिंदे गट करणार धमाका; मनसे, राष्ट्रवादीचे अनेक नेते लागले गळाला?

मुंबई, ठाणे पाठोपाठ शिंदे गटाने आता पुण्यात सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे.

जाहिरात

मुंबई, ठाणे पाठोपाठ शिंदे गटाने आता पुण्यात सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 17 ऑक्टोबर : शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. आता पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुण्यातील अनेक मोठे नेते हे बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या गळाला लागले आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीच आयाराम-गयाराम गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. मुंबई, ठाणे पाठोपाठ शिंदे गटाने आता पुण्यात सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे. (अंधाऱ्या खोलीत खांद्यावरील तो हात कुणाचा? राज ठाकरेंनी सांगितला शिवनेरीवरील अंगावर काटा आणणारा अनुभव) पुण्यात एकनाथ शिंदेंचा गट मोठ्या पक्षांना धक्का देण्याचा तयारीत आहे. पुण्यातील अनेक मोठे नेते हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला आहे.  पुण्यातील अनेक बडे नेते बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक नेते हे आपल्या संपर्कात आहे. लवकरच ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे, असा दावा  बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी केला आहे. (दाताची सर्जरी सुरू असताना गेली लाईट, मोबाईलच्या टॉर्चमध्ये पार पडली शिंदे सरकारच्या मंत्र्याची सर्जरी) पुणे महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून शिंदे गटाने तयारी केली आहे. लवकरच गणेश कला क्रीडा संकुलात पुण्यात पक्षाचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात शहरातील अनेक बडे नेते पक्षात प्रवेश करणार, असल्याचा दावा भानगिरे यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या