JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune : फ्लॅटच्या व्यवहारात फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स, Video

Pune : फ्लॅटच्या व्यवहारात फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स, Video

पुण्यात घराची विक्री करताना सावधान राहा कारण पुण्यामध्ये बोगस ब्रोकरची टोळी सक्रीय झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 16 सप्टेंबर : पुण्यात घराची विक्री करताना सावधान राहा कारण पुण्यामध्ये बोगस ब्रोकरची टोळी सक्रीय झाली आहे. पुण्यामध्ये सध्या ही ब्रोकरची टोळी फसवणूक करत आहे. पुण्यामध्ये एक मोठा गैरप्रकार नुकताच उघडकीस आला आहे. कोंढवा येथील चार मजली निवासी मालमत्ता गेल्या वर्षभरात सुमारे 6 वेळा खरेदी, विक्री आणि गहाण ठेवली गेल्याचा प्रकार समोर आला आहे. जे त्याच्या मूळ मालकाला माहीत नव्हते. पुण्यातील कोंढवा परिसरात किरण चढ्ढा, सुमन खंडगळे, नीरू गुप्ता आणि अंजली गुप्ता या चार महिलांच्या मालकीची ही इमारत आहे. या चार महिलांनी मिळून 1994 मध्ये ही मालमत्ता खरेदी केली होती. याबाबत डीसीपी नम्रता पाटील यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षापासून नंदनवन सोसायटी विक्रीसाठी उपलब्ध होती. त्यासाठी घरमालकांनी आपल्या घराची कागदपत्रे एका ब्रोकरकडे दिली होती. दोन वर्षापासून ब्रोकर विविध लोकांना इमारत दाखवण्यासाठी आणत असे मात्र व्यवहार होत नव्हते. याच कालावधीमध्ये कोंढवा भागातील रजिस्ट्रेशन कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांना या इमारतींच्या कागदपत्रांमध्ये गडबड झाल्याचे दिसून आले आणि इथून सदर रॅकेट उघडकीस आले. हेही वाचा :  पुण्यात उच्चशिक्षित सुनेसोबत धक्कादायक कृत्य, काळे कपडे घालू नको…. ब्रोकरने इमारत 6 वेगवेगळ्या बँकांना गहाण ठेवून बँकांकडून पैसे घेतले होते आणि यासाठी त्यांनी खोटे इमारतीचे मालक उभे केले होते. इमारतीच्या मूळ दस्तऐवजांची झेरॉक्सवरती त्यांनी विविध बँकांना गंडा घातला आणि विविध रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये जाऊन कागदपत्रांची सर्व व्यवहार केले गेले होते. मात्र, याची खबर ना इमारत मालकांना होती ना रजिस्ट्रेशन ऑफिसला आणि नाही बँकांना हा घोळ समजला. सदर घटनेमधील सर्व आरोपींना अटक केली असून पुढील सर्व तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाच्यामुळे काही महत्त्वाचे मुद्दे समोर  आपल्या घराची कागदपत्रे विश्वासू ब्रोकरलाच आपण द्यावीत नाहीतर अशा गैरप्रकाराद्वारे आपले नुकसान होऊ शकते. सदर घटनेमध्ये मूळ मालकांचा कोणताही आर्थिक तोटा नाही झाला. मात्र, त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. त्यासोबतच बँकांनी देखील निष्काळजीपणा दाखवून या प्रकरणांमध्ये आरोपींना गैरकारभार करण्यास मोकळीक सोडलेली दिसून आली. तसेच रजिस्ट्रेशन कार्यालयामध्ये देखील मूळ डॉक्युमेंट्सची तपासणी न करता व्यवहार झाले आहेत असे देखील या वेळेस दिसून आले. फ्लॅटची विक्री करताना अशी घ्या काळजी  विश्वासू ब्रोकरच्या मार्फतच व्यवहार करा सर्व कागदपत्रं एकदम देऊ नका व्यवहार फायनल होईपर्यंत कागदपत्रांचा ताबा स्वत:कडेच ठेवा खरेदी करणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी तपासा रजिस्टर ऑफिसमध्ये देताना स्वत: उपस्थित राहा हेही वाचा :  शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक धक्का; बारामतीतील हा मोठा प्रकल्प जुन्नरला हलवणार पुणे पोलिसांचं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन जेव्हा बँकांची लोक आपल्या घराची पाहणी करण्यासाठी येतील. त्यावेळेस त्यांच्याकडून देखील कशाबाबत खरेदी विक्री होणार आहे. याची देखील माहिती जाणून घ्यावी. घराची पाहणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारा बँक अधिकाऱ्यांकडून व्यवहाराची पडताळणी करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या