पुणे, 27 जुलै : बऱ्याच लोकांकडे अंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी बाथरुममध्ये गॅसवर चालणारा गीझर बसवलेला असतो. या गीझरवर स्पष्ट वॉर्निंग लिहिलेली असते, की पुरेसं व्हेंटिलेशन असलेल्या जागेतच याला बसवा. मात्र कित्येक लोक याकडे दुर्लक्ष करतात. पुण्यातही अशाच निष्काळजीपणामुळे (Gas geyser accident) एका व्यक्तीचा जीव गेला असता; मात्र त्याच्या पत्नीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना (Pune wife saved Husband’s life) टळली. टाइम्स ऑफ इंडिया ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. नेमकं काय घडलं? रविवारी (24 जुलै) ही घटना घडली. एक 64 वर्षांची व्यक्ती सकाळी नेहमीप्रमाणे अंघोळीला गेली होती. मात्र या व्यक्तीला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याचं त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी बाथरूमचं दार वाजवून आपल्या पतीला आवाज दिला. मात्र आतून कोणतीही प्रतिक्रिया न आल्यामुळे त्यांनी इतर नातेवाईकांना बोलवलं. अखेर बाथरूमचा दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये ही व्यक्ती बेशुद्ध पडल्याचं (Pune man become unconscious due to Gas Geyser) दिसून आलं. त्यानंतर त्यांना तातडीने प्रयाग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये त्यांना थेट व्हेंटिलेटर लावूनच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. “या व्यक्तीला रुग्णालयात आणले तेव्हा ते कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते. त्यांचा श्वासोच्छवासदेखील अगदी कमी होता. त्यामुळे आम्ही त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेतला. यानंतर दुसऱ्या दिवशी या व्यक्तीची प्रकृती भरपूर सुधारली. ते आता धोक्याच्या बाहेर असून, आता त्यांचा व्हेंटिलेटर काढला आहे.” अशी माहिती प्रयाग रुग्णालयातील (Prayag Hospital) क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉ. कपिल बोरावके यांनी दिली. गॅस गीझर सिंड्रोम डॉ. कपिल यांनी सांगितलं, की या घटनेला गॅस गीझर सिंड्रोम (Gas Geyser syndrome) किंवा गॅस गीझर एन्सेफॅलोपॅथी म्हणतात. बाथरुममध्ये योग्य व्हेंटिलेशन नसेल, तर गॅस गीझरमधून बाहेर पडणारा कार्बन मोनोक्साईड (Carbon Monoxide in Gas geyser) गॅस श्वासामार्फत शरीरात जातो, ज्यामुळे मोठे दुष्परिणाम समोर येतात. या प्रकरणात देखील असंच झालं असल्याचे बोरावके यांनी सांगितलं, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात एलपीजी गॅस गीझरमुळे (LPG Gas geyser accidents) अशा प्रकारच्या दुर्घटना होण्याचे प्रमाण वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं. गेल्या काही महिन्यांमध्येच त्यांनी अशा सात रुग्णांवर उपचार केले आहेत. तसेच, दरवर्षी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अशी पाच ते सहा प्रकरणं येतातच असंही त्यांनी स्पष्ट केलं. “गेल्या काही महिन्यात बाथरुममध्ये अचानक बेशुद्ध झालेले काही रुग्ण आले होते. हे रूग्णदेखील उपचारांनंतर वेगाने बरे झाले. अशा दुर्घटनांमध्ये प्राथमिक दृष्ट्या डोक्याला दुखापत किंवा स्ट्रोक हे कारण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. मात्र, न्यूरोइमेजिंग आणि इतर तपासण्या केल्यानंतर लक्षात आले की विषारी वायू शरीरात गेल्यामुळे हे झाले आहे.” हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर बरं झाल्यानंतरही राहतात गंभीर दुष्परिणाम दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. राहुल कुलकर्णी यांनीही याबाबत माहिती दिली. “अशा प्रकरणांमध्ये कित्येक रुग्ण 24 तासांमध्येच बरे होतात. मात्र, काही प्रकरणांमध्ये कायमस्वरुपी ब्रेन डॅमेज (Permanent Brain Damage) झालेलेही मी पाहिले आहे. अर्थात, ही दुर्मिळ गोष्ट आहे.” असं त्यांनी स्पष्ट केलं. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा एलपीजी गीझर वापरताना घ्या खबरदारी एलपीजी गॅसवर चालणारे वॉटर हीटर (LPG water heater) हे स्वस्त असल्यामुळे त्यांना भरपूर मागणी असते. तसेच, त्यासाठी वीज लागत नसल्यामुळेही लोक हे गीझर घेणे पसंत करतात. मात्र, चांगले व्हेंटिलेशन नसलेल्या बाथरूममध्ये (Gas geyser in poor ventilated room) असे गीझर बसवणे हे जीवावरही बेतू शकते; असा इशारा डॉ. बोरावके यांनी दिला.