JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कॅन्सरच्या निदानानंतर प्रकाश आमटेंची प्रकृती कशी आहे? मुलाने दिली आनंदाची बातमी!

कॅन्सरच्या निदानानंतर प्रकाश आमटेंची प्रकृती कशी आहे? मुलाने दिली आनंदाची बातमी!

दोन महिन्यांहून अधिक काळापासून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 25 ऑगस्ट : डॉ.प्रकाश आमटे यांना हेअरी सेल ल्युकेमिया  ब्लड कॅन्सरचे   (hairy cell leukemia Blood Cancer) निदान झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी (13 जून) समोर आली होती. त्यानंतर त्यांना पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दीड महिन्यापूर्वी केमोथेरपी सुरू असताना खोलीत अडखळून पडल्याने त्यांचे मनगट फ्रॅक्चर झालं होतं. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. येत्या शुक्रवारी डॉक्टरांनी नागपूरला जाण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती प्रकाश आमटे यांचे पूत्र अनिकेत आमटे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. याबाबत त्याने आनंद व्यक्त केला आहे. या 2 कारणांमुळे वाढते कॅन्सर होण्याची जोखीम; तुम्हीही यापैकी असाल तर आजच बदला सवयी 2 महिने सलग ताप आणि न्युमोनिया मुळे प्रकाश आमटेंचं तब्बल 9 किलो वजन कमी झालं आहे. DMH मधील डॉक्टरांचे अथक प्रयत्न, तेवढ्याच प्रेमाने नर्स आणि स्टाफ यांनी केलेली सेवा आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा याचमुळे बाबा बरे होत आहेत, अशी भावना अनिकेतने व्यक्त केली.

तो आनंद वेगळा आहे- अनिकेत आमटे… गेली अडीच महिने पुण्यात Dinanath Mangeshkar Hospital येथे कॅन्सर वरील उपचार घेऊन बाबांची तब्येत आता सुधारली आहे. 5 केमोथेरपी ने काम केले आहे. आज हाताचे प्लॅस्टर काढले. केमोथेरपी सुरू असतांनाच खोलीत अडखळून पडल्याने मनगट फ्रॅक्चर झाले होते. त्याला आज दीड महिना झाला म्हणून प्लॅस्टर काढले. आज दवाखान्यात डॉक्टरांनी फॉलोअप साठी बोलावले होते. समाधानकारक सुधारणा असल्याने येत्या शुक्रवारी डॉक्टरांनी नागपूरला जायची परवानगी दिली आहे. तो आनंद वेगळा आहे.

मधले काही दिवस त्यांच्यासाठी आणि आमच्या साठी अतिशय खडतर गेले. 2 महिने सलग ताप आणि न्युमोनिया मुळे 9 किलो वजन कमी झाले आहे. असा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर सारखा भयंकर आजार कोणालाही होऊ नये अशी निसर्गाला प्रार्थना करतो. DMH मधील डॉक्टरांचे अथक प्रयत्न, तेवढ्याच प्रेमाने नर्स आणि स्टाफ यांनी केलेली सेवा आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा याच मुळे बाबा बरे होत आहेत. कुठल्याही इन्फेक्शनचा धोका होऊ नये म्हणून सध्या गर्दी टाळावी असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पुढील काही दिवसांनी डॉक्टरांच्या परवानगीने बाबा सर्वांना भेटू शकतील. आम्ही सर्व कुटुंबीय आपले खूप खूप आभारी आहोत. पुण्यात 75 दिवस वास्तव्य असताना अनेकांनी विविध मार्गाने सहकार्य केले. लोभ असावा असाच कायम.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या