पुणे, 12 ऑक्टोबर : जुलै महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आता परतीच्या मार्गावर आहे. होत असलेल्या परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. परतीच्या पावसाने पुण्यात आज जोरदार हजेरी लावली. राज्यभर परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील पुरंदर, बारामती, दौंड आणि इंदापूर भागात देखील पावसाची संततधार सुरू आहे. पुरंदर तालुक्यातील पुणे- पंढरपूर रस्त्यावरील दिवेघाटात तर ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. तसेच घाटातील रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आले आहे. दरम्यान, मस्तानी तलाव हा ओसंडून वाहत आहे.
अचानक आलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ - गेल्या आठवड्यात अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची ताराबंळ उडाली होती. यानंतर मुंबईत पावसाने दडी जरी मारली असली तरी ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवल्याचे प्रखर्षाने दिसून आले. कुलाबा येथे सोमवारी 31.2 तर सांताक्रूझ येथे 31.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे 1.1 आणि 1.2 अंशांनी कमी होते.
हेही वाचा - Time Cafe : पुण्यातील कॅफेमध्ये पदार्थांची नाही तर वेळेची मोजावी लागते किंमत! पाहा Video मान्सूनच्या माघारीस पोषक स्थिती - मान्सून वायव्य भारतातून 3 ऑक्टोबर रोजी परतल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. परतीच्या वाटचालीत मान्सूनची उत्तरकाशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंतची सीमा तब्बल आठवड्यानंतरही मंगळवारी (ता. 11) कायम होती. माघारीस पोषक वातावरण होत असल्याने चार ते पाच दिवसांत मध्य भारताच्या काही भागातून मान्सून गायब होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. येत्या काही दिवसांत हवेच्या दाबाचा हा पट्टा पश्चिम किंवा वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता आहे. हा पट्टा दक्षिण विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि आसपासच्या भागातून पुढे जाऊ शकतो.