JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune : पैशांसाठी बापानेच केलं अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक कृत्य, प्रलोभन देऊन पुण्याहून घेऊन गेला औरंगाबादला आणि...

Pune : पैशांसाठी बापानेच केलं अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक कृत्य, प्रलोभन देऊन पुण्याहून घेऊन गेला औरंगाबादला आणि...

आपल्या पोटच्या 17 वर्षांच्या मुलीला प्रलोभन दाखवून तिचा बाप तिला औरंगाबादला (Aurangabad) घेऊन गेला होता. तेथे मुलाकडून त्याने 2 लाख रुपये आणि दुचाकी घेतली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 3 जून : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या (Physical Abused) घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अनेकांनी बाप-मुलीच्या नात्याला काळीमा फासल्याचेही तुम्ही वाचले असेल. त्यात आता पुण्यातून (Pune) आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैशांसाठी नराधम बापाने आपल्या अल्पवयीन मुलीला जबरदस्ती लग्न (Forced to Marriage) करण्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्या पोटच्या 17 वर्षांच्या मुलीला प्रलोभन दाखवून तिचा बाप तिला औरंगाबादला (Aurangabad) घेऊन गेला होता. तेथे मुलाकडून त्याने 2 लाख रुपये आणि दुचाकी घेतली. यानंतर आपल्याच अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीनेच केली पतीची तक्रार - अनिस असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या पत्नीनेच त्याच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) याप्रकरणी फिर्याद दिली. फिर्यादित असे म्हटले आहे की, त्यांना एक 17 वर्षाची मुलगी आहे. तिला प्रलोभने दाखवण्यात आली आणि आरोपी बाप तिला लग्न (Marriage) करण्याच्या उद्देशाने 2017 मध्ये औरंगाबाद येथे घेऊन गेला. हेही वाचा -  लग्नातून महिलेचं अपहरण, 9 जणांकडून रेप, 4 लाखांमध्ये विक्री; पती मात्र घरात शांत बसून इतकेच नव्हे तर सादिक नावाच्या एका तरुणासोबत लग्न करण्याची जबरदस्तीही केली. यानंतर सादिक याच्याकडून दोन लाख रुपये आणि दुचाकी घेतली. मुलीने या लग्नाला विरोध केल्यावर तिला त्याने मारहाणही केली. ही मुलगी संधी साधून आपल्या आईकडे पुण्यात परत आली. तिने आपल्या आईला घडलेली हकिकत सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दगडे तपास करीत आहेत. हिंगोलीतही छेडछाडीला कंटाळून एकीची आत्महत्या -  हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात उटी ब्रह्मचारी नावाचे गाव आहे. या गावातील अजय समाधान इंगोले आणि शिवाजी पांढरे हे दोनही जण ऋतुजा हिला त्रास देत होते. या दोघांच्या त्रासाला ऋतुजा कंटाळली होती. यातूनच तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिने 25 मेला सकाळी उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. घरच्यांचा लक्षात हा प्रकार आल्यावर लगेचच तिला सुरुवातीला सेनगाव येथील रूग्णालयात व त्यानंतर औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान, 26 मेला गुरुवारी तिचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या