JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Diwali 2022: पुणेकरांना दिवाळीची ट्रिट, हे फटाके तुम्ही खाऊ देखील शकता! VIDEO

Diwali 2022: पुणेकरांना दिवाळीची ट्रिट, हे फटाके तुम्ही खाऊ देखील शकता! VIDEO

Diwali 2022 : मूर्तीज बेकरीच्यावतीने लहान मुलांनी दिवाळीत फटाके न फोडता या अनोख्या फटाक्यांसह पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी. या उद्देशाने फटाक्यांचे चॉकलेट तयार करण्यात आले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 19 ऑक्टोबर : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे पुण्यातील बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या असून नागरिकांची खरेदीला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहिला मिळत आहे. दिवाळी म्हटलं की फटाके आलेच. दरवर्षी पर्यावरण प्रदूषणाच्या दृष्टीने दिवाळीत फटाके फोडू नये असे आवाहन करण्यात येत असते. मात्र, तरी देखील नागरिक मोठ्या प्रमाणात फटाके फोडतात. एकीकडे पर्यावरणासाठी जनजागृती केली जात आहे. तर दुसरीकडे मात्र फटाके काही कमी होताना दिसून येत नाहीत. हीच बाब लक्षात घेता पुण्यातील 85 वर्ष जुनी असलेल्या मूर्तीज बेकरीच्यावतीने गेल्या 10 ते 15 वर्षांपासून फटाक्यांचे चॉकलेट विकले जात आहेत. या उद्देशाने बनवले जातात चॉकलेटचे फटाके दिवाळीत मध्ये लहान मुलांना फटाके हे खूप आवडतात. हीच बाब लक्षात घेत 10 ते 15 वर्षांपासून मूर्तीज बेकरीचे मालक विक्रम मूर्ती यांनी चॉकलेटच्या माध्यमातून फटाके तयार करायला सुरुवात केली आहे. “आमचा मूळचा बेकरीचा व्यवसाय असून या व्यवसायामुळे आम्हाला बेकरी प्रोडक्ट कसे बनवायचे याबद्दलची विशेष माहिती आहे. आणि याच आमच्या ज्ञानाचा वापर करून आम्ही लहान मुलांच्यासाठी खास या चॉकलेटचे फटाके बनवतो. लहान मुलांनी दिवाळीत फटाके न फोडता या अनोख्या फटाक्यांसह पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी. या उद्देशाने आम्ही चॉकलेटचे फटाके दरवर्षी तयार करतो आणि हे फटाके मुलांना खाता सुद्धा येतात”, असं मूर्तीज बेकरीचे मालक विक्रम मूर्ती सांगतात. हेही वाचा :  Diwali Shopping : दिवाळीनिमित्त घर सजावटीसाठी तोरण हवंय? इथे पाहा नवे ट्रेंड, Video या प्रकारचे फटाके बाजारात उपलब्ध  या चॉकलेटच्या फटाक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असून नागरिकांकडून गिफ्ट देण्यासाठी देखील याचा वापर केला जात आहे. मुलांना फटाके आणि चॉकलेट आवडीचे असल्याने ‘फटाका चॉकलेट’ ही संकल्पना बाजारात आली आहे. या चॉकलेट्स फटाक्यांमध्ये रॉकेट, भुईचक्र, लक्ष्मी बॉम्ब, बॉम्ब अशा विविध फटाक्यांचे प्रकार आहेत. तसेच विशेष म्हणजे मूर्तीज बेकरीच्या वतीने चॉकलेटचा किल्लादेखील बनवण्यात आला आहे.

चॉकलेटच्या गिफ्ट हॅम्परला मोठ्या प्रमाणात मागणी विशेष म्हणजे यावर्षी चॉकलेट फटाक्यांचे गिफ्ट हॅम्पर बनविण्यात आले असून या चॉकलेटच्या गिफ्ट हॅम्परला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हे चॉकलेटचे फटाके देशभरातून मागवले जात असून या फटाक्यांना देखील मोठी मागणी आहे. यामध्ये एका फटक्याचे चॉकलेट 15 रुपये पासून सुरू होते तर गिफ्टसाठी देखील विविध किंमतीत उपलब्ध आहेत.

गुगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

मूर्तीज बेकरी पत्ता  पद्मसुंदर निवास, 399 सोमवार पेठ, पुणे, महाराष्ट्र 411001

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या