JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dahi Handi : दहीहंडीवरील निर्बंध उठले तरी बाजारात उठाव नाही, विक्रेत्यांचं टेन्शन वाढलं! VIDEO

Dahi Handi : दहीहंडीवरील निर्बंध उठले तरी बाजारात उठाव नाही, विक्रेत्यांचं टेन्शन वाढलं! VIDEO

दहीहंडीचा (Dahi Handi) उत्सव आता काही तासांवर आलाय. पण, अजूनही बाजारात फारसा उठाव नसल्यानं दहीहंडी विक्रेत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 18 ऑगस्ट : बालगोपाळांचा आवडता सण म्हणजे दहीहंडी.  श्रीकृष्णाच्या बाललीलांचे प्रतीक म्हणून दहीहंडी (Dahi Handi) फोडली जाते. त्याचा काला सर्वांमध्ये वाटला जातो. गेली दोन वर्ष या उत्सवावर कोरोनाचं सावट होतं. आता कोरोनाचं सावट कमी झालं असून कोणत्याही निर्बांधाशिवाय दहीहंडी साजरी होणार आहे. दहीहंडीचा उत्सव आता काही तासांवर आलाय. पण, अजूनही बाजारात फारसा उठाव नसल्यानं दहीहंडी विक्रेत्यांचं टेन्शन वाढलं आहे. दहीहंडी विक्रेते रोहित शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. यामुळे दहीहंडी खरेदीसाठी उत्साह असला तरी अजूनही अपेक्षित उठाव दिसत नाही. लोकांचा उत्साह पाहून आम्ही दोनवर्षांपूर्वी असलेले दरच यंदाही कायम ठेवले आहेत. आम्ही आत्तापर्यंत 900 हंड्या बनवल्या असून त्यामधील 150 हंड्या विकल्या गेल्या आहेत. आमच्याकडे सध्या 85 ते 500 रूपयापर्यंतच्या हंड्या आहेत. हंडीच्या आकारापासून ते हंडीवर केलेल्या नक्षीकामापर्यंत सर्व खर्चाचा या किंमतीमध्ये समावेश आहे. हंडीला रंग देण्याचं काम अजूनही सुरू आहे. पावसामुळे हा रंग लवकर वाळत नाही. आता दहीहंडीच्या दिवशीच या विक्रीमध्ये जास्त वाढ होईल, अशी आम्हाला आशा आहे,’ असं शिंदे यांनी सांगितलं. Janmashtami 2022: ‘कृष्ण जन्माष्टमी’ स्पेशल परीचा क्युट VIDEO पाहिला का?, दिसतेय फारच गोंडस रंगांच्या किंमती वाढल्या आहेत. मालाच्या आणि मजुरीच्या दरामध्येही वाढ झालीय. पण यंदा दोन वर्षानंततर दहीहंडी साजरी होणार असल्यानं आम्ही माफक किंमतीमध्ये हंडी विक्री करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील कुंभारवाडामधील हंडी विक्रेत्यांनाही साधारण प्रतिसाद मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या