JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाजपची नवी खेळी, शिंदे गटातील माजी खासदाराला देणार डच्चू? या मतदारसंघातील उमेदवाराविषयी मोठा खुलासा

भाजपची नवी खेळी, शिंदे गटातील माजी खासदाराला देणार डच्चू? या मतदारसंघातील उमेदवाराविषयी मोठा खुलासा

शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या शिंदे गटात असलेले शिवाजी आढळराव पाटील शिरूर मतदासंघातून उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक आहेत. मात्र, आता भाजप याठिकाणी उमेदवार देणार असल्याचं सांगितलं जात आहे (Shirur Lok Sabha Constituency)

जाहिरात

देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे 15 सप्टेंबर : एकनाथ शिंदे गटातील आणखी एक समर्थकांच्या जागेवर भाजपने दावा केला असल्याचं समोर आलं होतं. पुण्यातील शिरूर लोकसभा जिंकण्याच्या उद्देशाने भाजपने मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री रेणूका सिंह शिरूर लोकसभेचा तीन दिवसीय दौरा करत आहेत. आता रेणूका सिंह यांनीच यामागचा उद्देश सांगत मोठा खुलासा केला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकत वाढावी यासाठी केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर जबादारी दिली असून त्यासाठी 3 दिवस या मतदारसंघात फिरत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या केंद्रीय नेत्या रेणूका सिंह यांनी दिली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या शिंदे गटात असलेले शिवाजी आढळराव पाटील शिरूर मतदासंघातून उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक आहेत. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना सोडणार होते. याच कारणामुळे आढळरावांनी शिंदे गटाशी घरोबा केला असल्याचं सांगितलं जातं. अशात आता भाजपनेही इथे आपला उमेदवार देण्याची तयारी केल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.   वेदांताचं महाराष्ट्रासाठीचं महाव्हिजन, फडणवीसांचा रशियातून विरोधकांवर प्रहार! याबाबत बोलताना रेणूका सिंह म्हणाल्या, की स्थानिक माजी खासदार आमच्यासोबत युतीत होते, तेव्हा त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, आता दिवस बदलले आहेत. आम्ही आमची ताकत आजमावनार आहोत, असं रेणूका सिंह यांनी म्हटलं. एकंदरीतच शिरूर मतदारसंघात भाजपचाच उमेदवार देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्याबद्दल सुरू असलेल्या उमेदवारीच्या चर्चेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. रेणूक सिंह यांचा शिरुर लोकसभा मतदारसंघात 3 दिवस दौरा आहे. बुधवारी रात्री मंचर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचालेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. स्थानिक माजी खासदार शिवाजी आढळराव शिंदे गटात आहेत. अशात शिंदे गट आणि भाजप युती असताना भाजप शिरुरमधून लोकसभेसाठी उमेदवार देणार का? या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या