JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'आम्हाला विश्वासात न घेता ही घोषणा', श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा मोठा खुलासा

'आम्हाला विश्वासात न घेता ही घोषणा', श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा मोठा खुलासा

यादरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने मोठा खुलासा केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 27 ऑगस्ट : श्रीनगरच्या (Srinagar)लाल चौकासह राज्यात आठ ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून याबाबत पुण्यातील आठही गणेशोत्सव मंडळांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यासाठी पुण्यातून गणपतीची मूर्ती श्रीनगरला पाठवण्यात येणार असल्याचंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले होते. मात्र या पत्रकार परिषदेनंतर मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रमुख 8 मानाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेले श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे महेश सूर्यवंशी यांनी याबाबत खुलासा केला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेतील घोषणेशी श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सहमत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. आम्हाला विश्वासात न घेता ही घोषणा करण्यात आली आहे. पोलिसांकडून याबाबतील आम्हाला विचारणा करण्यात आल्यानंतर हा खुलासा करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. Ganeshotsav 2002: बाप्पाच्या दरबारात रंगणार सत्तांतराचा रंग, राजकीय देखाव्यांना मोठी पसंती, VIDEO पुढच्या वर्षी पुण्यातील 8 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे जम्मू-काश्मिरात आठ ठिकाणी गणेशोत्सव साजरा करणार आहेत, असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाने आपलं म्हणणं मांडलं आहे. श्रीनगरच्या चौकासह 8 ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या