JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यात रिक्षाचा प्रवास महागला! CNG, इंधन दरवाढीमुळे निर्णय घेतल्याची माहिती, अशी आहे भाडेवाढ

पुण्यात रिक्षाचा प्रवास महागला! CNG, इंधन दरवाढीमुळे निर्णय घेतल्याची माहिती, अशी आहे भाडेवाढ

पुणे शहरात रिक्षाचा प्रवास आता महागला आहे. आम आदमी पक्षाने आंदोलन केल्यानंतर आरटीओने हा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 25 जुलै : पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे आधीच कंबरडे मोडले आहे. जीवनावश्यक गोष्टींच्या दरांनी सामांन्यांचे बजेट बिघडले आहे. यातच आता आणखी एक झटका सहन करावा लागणार आहे. सध्या तरी ही बातमी पुणेकरांसाठी आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे आता रिक्षा भाडेवाड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता रिक्षाने प्रवास करण्यासाठी थोडा जास्त खिसा खाली करावा लागणार आहे. पुण्यात रिक्षांची भाडेवाढ पुणे शहरात सीएनजी, इंधन दरवाढीमुळे रिक्षा भाड्यात 2 रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन दरआकारणीनुसार पहिल्या 1.5 किमीसाठी 21 रूपयेऐवजी आता 23 रूपये मोजावे लागणार आहे. तर त्यापुढील प्रत्येक किमीसाठी 14 रूपयांऐवजी 15 रूपये मोजावे लागणार आहे. पुणे आरटीओचे अधिकारी अजय शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. रिक्षा भाडेवाढीसाठी आप रिक्षा संघटनेनं आंदोलन  सुरू केलं होतं. त्यानंतर पुणे आरटीओने हा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार? सरकार डीए 4 टक्के वाढवण्याच्या तयारीत पुणेकर त्रस्त इंधन दरवाढीच्या सततच्या किमतींनी हैराण झालेला पुणेकर या बातमीने आणखी दुखी झाला आहे. कारण, इंधनाचे दर वाढल्याने सर्वच वस्तूंचे दर वाढत आहेत. सध्या बटाटे, कांदा, टोमॅटोचे भावही गगनाला भिडले आहेत. जीएसटीने त्यात आणखी भर घातली. अशा स्थितीत वाढत्या महागाईत सामान्य माणसाने भाकरी कशी खायची किंवा मुलांचे संगोपन कसे करायचे आणि भविष्यासाठी दोन पैसे कसे वाचवायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातही कसाबसा संसाराचा गाडा हाकणाऱ्या पुणेकरांना ही भाडेवाड जखमेवर मीठ चोळण्यासारखं असल्याची प्रतिक्रिया पुणेकर देत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या