JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pune : पुणे शहरात रक्ताचा तुटवडा! पाहा का आली इतकी गंभीर वेळ, Video

Pune : पुणे शहरात रक्ताचा तुटवडा! पाहा का आली इतकी गंभीर वेळ, Video

पुणे शहरामध्ये गेल्या 15 ते 20 दिवसापासून मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. शहरात अचानक साठा कमी होण्याची कारणं समोर आली आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 22 नोव्हेंबर :  पुणे शहरामध्ये गेल्या 15 ते 20 दिवसापासून मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. शहराच्या एकूण मागणीपेक्षा 40 ते 50 टक्के रक्ताचा पुरवठा कमी होत आहे, अशी माहिती समोर आलीय. दिवाळीनंतर ही परिस्थिती जाणवत असून याची काही कारणं आहेत. आनंद ऋषी आश्रम ब्लड बँकेचे डॉक्टर दिलीप परदेशी यांनी या विषयावर दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सुट्टीमध्ये अनेक जण आपल्या गावी किंवा बाहेरगावी फिरायला जातात. त्यामुळे त्यांचे रक्तदानाकडे दुर्लक्ष होते. या सोबतच या कालावधीमध्ये महाविद्यालयांना देखील सुट्टी असते यामुळे महाविद्यालयात देखील रक्तदान शिबिर होत नाहीत. आयटी कंपनीमध्ये देखील वर्क फ्रॉम होम मुळे रक्तदान शिबिरे आयोजित होत नाही. यामुळे देखील रक्तदानाचे प्रमाण सध्या कमी आहे. Video : पुण्यातील नवले पुल का झालाय मृत्यूचा सापळा? स्थानिकांनी सांगितलं महत्त्वाचं कारण त्याचबरोबर शहरात सध्या जी रक्तदान शिबिरं होत आहेत त्यामध्ये योग्य रक्तदात्यांची कमतरता आहे. त्यामुळे देखील शिबिरांमधून गेल्या काही दिवसापासून कमी रक्त संकलन होत आहे. याचा परिणाम शहरातील वैद्यकीय सेवेवर झाला आहे. थॅलेसमिया सारख्या विविध रक्तांच्या आजारांना पुणे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताची मागणी असते. मात्र सध्या मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त प्रमाणामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा कमी जाणवत आहे. यासाठी सर्व नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेवटच्या प्रवासातील आधार! अंत्यसंस्काराची सर्व जबाबदारी पार पाडणारे ‘सुखांत’ रक्तदान शिबिर दिवाळीनंतर कमी झाल्यामुळे पुणे शहरांमध्ये रक्ता तुटवडा जाणवला आहे. यासोबतच डेंगू मलेरिया सारख्या आजारांची साथ सध्या पुण्यात आल्यामुळे रक्ताची मागणी जास्त आहे. आणि या मागणीनुसार पुरवठा सध्या कमी होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या