पिंपरी चिंचवड, 7 एप्रिल : चिंचवडगावातील पागेची तालीम भागातील एका जुन्या घराला भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र आगीमुळे घराचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच आजूबाजूच्या घरांनाही मोठी झळ पोहोचली आहे. माहिती मिळताच दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.