JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यात गोल्डमॅनचं निधन, अंगावर साडेआठ किलो सोनं घालून दिली होती राष्ट्रवादीची मुलाखत

पुण्यात गोल्डमॅनचं निधन, अंगावर साडेआठ किलो सोनं घालून दिली होती राष्ट्रवादीची मुलाखत

पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान सम्राट मोझे यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्यातच त्यांनी आपला 39 वा वाढदिवस साजरा केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पिंपरी चिंचवड, 6 मे: पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन व उद्योजक सम्राट मोझे यांचे हृद्यविकारकने निधन झालं. पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान सम्राट मोझे यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्यातच त्यांनी आपला 39 वा वाढदिवस साजरा केला. सम्राट मोझे यांचं बालपण चिंचवड गावात गेलं, त्यांचे प्राथमिक शिक्षण चिंचवडच्या चापेकर शाळेत झाले होते. नंतर ते पुण्यात स्थायिक झाले. वडील रामभाऊ मोझे यांच्या राजकीय कारकीर्तिमुळे त्यांना राजकीय वारसा लाभला. हेही वाचा.. फळं आणि भाजी खरेदीला जाताय, काळजी घ्या…नाहीतर घरी कोरोनालाही आणाल सम्राट मोझे यांनी काही दिवसांपूर्वीच बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून त्यांची बदनामी केली जात असल्याची पोलीस सायबर सेलला तक्रार दिली होती.

अंगावर साडेआठ किलो सोनं घालून दिली होती राष्ट्रवादीची मुलाखात सम्राट मोझे यांनी मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा सोन्याचा रेकॉर्ड ब्रेक केल्याचं  बोललं जातं. मोझे हे दररोज अंगावर जवळपास साडेआठ किलो सोनं घातल असत. पुण्यात राष्ट्रवादीकडून पुणे मनपा निवडणूक उमेदवारी मागण्यासाठी सम्राट मोझे यांनी चक्क अंगावर साडे आठ किलो सोनं घालून मुलाखात दिली होती. यापूर्वी अंगावर दोन किलो सोनं असलेल्या रमेश वांजळे यांना राष्ट्रवादीनं तिकीट नाकारलं होतं. सम्राट पुण्याच्या संगमवाडीच्या प्रभाग क्रंमाक 13 मधून निवडणूक लढवणार होते. आपण केलेल्या सामाजिक कार्यामुळे अजित पवार हे आपल्यला पुणे महानगर पालिका निवडणुकीची तिकीट देणारच असा विश्वास सम्राट मोझे यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. हेही वाचा.. मानलं गुरूजी! अपंग शिक्षकाने गरीब मजुरांसाठी केलेली मदत पाहून डोळ्यात येईल पाणी! हेही वाचा.. ‘या’ फोटो मागची कहाणी वाचून मुंबई पोलिसांबद्दल वाढेल अभिमान!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या