पुणे, 20 सप्टेंबर: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर पुन्हा एकदा आरोप करत 100 कोटींचा घोटाळा उघडकीस आणला. यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांच्यासह चंदक्रांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही मुश्रीफांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं आहे. गेले 24 तास सरकारची दंडुकेशाही सुरू होती. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं, असं चंदक्रांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच हसन मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोपही लागत नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांना लगावला आहे.
चरणजीत चन्नी बनले पंजाबचे नवे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांसह घेतली CM पदाची शपथ कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कायद्याची लढाई कोल्हापुरी चपलेनं लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोप्पं आहे, पण ईडीला फेस करणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल, असंही ते म्हणालेत. पश्चिम महाराष्ट्रात भाजप मजबूत आहे मुश्रीफांनी माझी चिंता करू नये, असं म्हणत त्यांनी मुश्रीफांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं आहे.
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुश्रीफ साहेब, पश्चिम महाराष्ट्रातून, कोल्हापुरातून आम्ही भुईसपाट झालो, असा आरोप तुम्ही करताय. पश्चिम महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर येत नाही. सोलापुरात भाजपचे फक्त दोन आमदार होते. ते आता 8 झाले आहेत. कोर्टाने इशारा देताच पंगा गर्ल सुनावणीला हजर; जावेद अख्तर मानहानी प्रकरणी अडचणीत वाढ
कारखान्यांमध्ये ज्या कंपन्यांमधून 98 कोटी आले त्या कंपन्या कुठे आहेत यावर बोला. त्या कंपन्यांनी कोलकातामधून सेनापती घोरपडे कारखान्यात कशी गुंतवणूक केली त्यावर तुम्ही बोला. त्यामुळे मला मुश्रीफ यांना आवाहन करायचं आहे शांत डोक्याने काम करायचं असतं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आमच्या रडारवर मंत्र्यांचे जावई नाहीतर भ्रष्टाचार असल्याचं चंद्रकांत पाटील स्पष्ट बोलले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे माझ्यावर खुशाल बदनामीचा खटला भरा. मुश्रीफ गुद्यावर येऊ नका, कायद्याने लढा. मी त्याचवेळी सीएमना बोललो होतो गृह खातं राष्ट्रवादीकडे देऊ नका. हे जे काही चाललं आहे हे त्याचे फलित आहे. कोल्हापूर कलेक्टर म्हणतात सोमय्यांच्या जीवाला धोका आहे. मग ते काय करतात. या सरकारला पैसेही धड खाता येत नाही. सगळा सावळा गोंधळ आहे. यांचा सीपी दोन महिने गायब आहे. मला नाही वाटत शरद पवार मुश्रीफांना या प्रकरणात पाठिशी घालतील. बंटी पाटील का बोलत नाहीत मुश्रीफांच्या बाजुने, आघाडीत भांडणं आहेत. मुश्रीफांनी चप्पल दाखवणं थांबवावं. ईडीच्या नोटीसीला उत्तर द्यावं. मी एवढा मोठा नाही की मी मुश्रीफ यांच्याविरोधात कटकारस्थान करेन. हसन मुश्रीफ यांचा भष्टाचार हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे. त्याचं उत्तर द्या. पहिले मग माझ्यावर आरोप करा. मुश्रीफ मनी लॉन्ड्रिंगमध्ये सामान्य माणसं अडकलीत. त्यांना पोलिसांनी संरक्षण द्यावं. राज्यसभेसाठी संजय उपाध्याय हे भाजपचे उमेदवार असतील. पक्षाचे सरचिटणीस आहेत. सगळ्या चौकशीला आम्ही तयार आहोत. पण झुंडशाहीला अजिबात घाबरणार नाहीत.