प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला
नांदेड, 5 नोव्हेंबर : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 150 दिवसांच्या या प्रवासाला सुरुवात केली. लवकरच ही यात्रा महाराष्ट्रातील नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेतून काय होणार? तुटले असेल तर काही जोडता येतं, हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून देश मुक्त करायचा असेल तर जाती अंतातासाठी आंदोलन उभारा मग देश जोडला जाईल असा सल्ला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना दिला. बौद्ध महासभेतर्फे नांदेडमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ही पदयात्रा म्हणजे पाण्याचा बुडबुडा : आंबेडकर राहुल गांधी यांच्या पदयात्रेतून काय सिद्ध होणार आहे? तुटले असेल तर काही जोडता येतं, हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून देश मुक्त करायचा असेल तर जाती अंतातासाठी आंदोलन उभारा मग देश जोडला जाईल, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना दिला. ही पदयात्रा म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे, हवा आहे तोपर्यंत आहे, हा मार्च संपला की बुडबुडा संपला असेही आंबेडकर म्हणाले. वाचा - Video : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वत:वर मारले चाबकाचे फटके, पण का? काँग्रेसवाल्यांकडे आता काही राहिले नाही : प्रकाश आंबेडकर काँग्रेस पक्षामधील नैतिकता संपली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेचे 16 जण निलंबित झाले आहेत. पण नांदेडकर आणि लातूरकर दोघेजण देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर बसायला, मस्का लावायला तयार आहेत, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. काँग्रेसवाल्यांकडे आता काही राहिले नाही. जे आहे ते वाचवण्याची मानसिकता त्यांची आहे, असे आंबेडकर म्हणाले. राहुल गांधी यांना सल्ला म्हणून असे वाक्य संबोधल्याने आंबेडकर यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांच्याकडे अंगुली निर्देश केला असल्याचे दिसते आहे.
कशी आहे काँग्रेसची पदयात्रा? काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी ही पदयात्रा सुरू झाली आहे. हा प्रवास 150 दिवस चालणार आहे. यावेळी ते 12 राज्यांमधून जाणार आहे. 3,570 किमी लांबीचा हा प्रवास जम्मू-काश्मीरमध्ये संपेल. ही यात्रा 12 राज्यांतील 20 शहरांमधून जाणार आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू होणारा प्रवास तिरुअनंतपुरम, कोची आणि केरळमधील निलांबूरपर्यंत गेला. यानंतर ते कर्नाटकातील म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, तेलंगणातील विकाराबाद, महाराष्ट्रातील नांदेड, जळगाव जामोद, मध्य प्रदेशातील इंदूर येथे पोहोचेल. येथून प्रवास जम्मूमार्गे कोटा, दौसा, राजस्थानमधील अलवर, उत्तर प्रदेशातील बुलंदशहर, दिल्ली, हरियाणातील अंबाला, पंजाबमधील पठाणकोटमार्गे श्रीनगरला पोहोचेल. येथे यात्रेचा समारोप होईल.