JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पैसे घेताना पकडताच पोलीस अधिकाऱ्याचा ACBकर्मचाऱ्यावर गोळीबार

पैसे घेताना पकडताच पोलीस अधिकाऱ्याचा ACBकर्मचाऱ्यावर गोळीबार

एका पोलीस अधिकाऱ्याने अँटीकरप्शनच्या कर्मचाऱ्यावर गोळी झाडण्याची हिंम्मत केलीच कशी असा सवाल लोकांनी विचारला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अकोला 12 जून : अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली. ज्यांनी लोकांचा रक्षण करावं अशी अपेक्षा असते अशा पोलीस अधिकाऱ्यानेच अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यावर गोळीबार केला. या गोळीबारात कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर अकोल्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अकोल्याच्या पिंजर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पैसे घेताना रंगेहात पकडले. आपण एसीबीच्या जाळ्यात अडकलो याची जाणीव होताच नागलकर यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून चक्क एसीबीच्याच कर्मचाऱ्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पिंजर पोलीस ठाण्याचे नंदकिशोर नागलकर यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी वरिष्ठ स्तरावर करण्यात आलेल्या आहेत. मात्र त्यानंतरही ते ठाण्यात कार्यरत होते. आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ठाणेदार नागलकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होण्याचे चिन्ह दिसताच या विभागाच्या कर्मचाऱ्यावर स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. यामध्ये सचिन धात्रक हे कर्मचारी  जखमी झाले. या घटनेनंतर पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि बेशिस्तपणावर लोकांनी शंका उपस्थित केलीय. एका पोलीस अधिकाऱ्याने अँटीकरप्शनच्या कर्मचाऱ्यावर गोळी झाडण्याची हिंम्मत केलीच कशी असा सवाल लोकांनी विचारला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रेयसीची केली निर्घृण हत्या पुण्यातल्या चंदननगर भागात लव्ह ट्रँगल अर्थात प्रेमाच्या त्रिकोणातून प्रियकाराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी रात्री 10 वाजता घडली. आरोपी प्रियकर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मीना पटेल (वय-22, रा. चंदननगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. तिला जखमी अवस्थेत कोकडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्या तिचा प्राणज्योत मालवली. या प्रकरणी आरोपी किरण अशोक शिंदे (वय-25, रा.काळेवाडी) याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, आरोपी किरण शिंदे हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.तो हिंजवडीतील एका कंपनीत नोकरी करतो. मीना आणि किरणचे प्रेमसंबंध होते. परंतु मीनाचे दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याचा किरणला संशय होता आणि या संशयातून त्याने मीनावर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या