बीड, 27 नोव्हेंबर, मागच्या कित्येक दिवसांपासून पोलीस भरतीवरून महाराष्ट्रात घमासान सुरू आहे. अखेर भरती प्रक्रीयेत फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. तरी बहुप्रतिक्षित पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली मात्र ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. फॉर्म भरण्यासाठी अवघे तीन दिवस उरल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याने बीड शहरात नेट कॅफे आणि ऑनलाईन सेंटरवर विद्यार्थी तळ ठोकून आहेत. तसेच साईड व्यवस्थित करा अन्यथा तारीख वाढवून द्या अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी चकरा मारूनही फॉर्म भरला जात नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. काही विद्यार्थी तर रात्री फॉर्म भरला जाईल म्हणून इंटरनेट कॅफेमध्ये मुक्कामास येत आहेत.
हे ही वाचा : वाचाळपणा बंद करा अन्यथा… राधाकृष्ण विखे पाटलांचा ठाकरेंवर प्रहार
दरम्यान याबाबत ऑनलाइन फॉर्म भरणाऱ्या केंद्रावर चालकाला विचारले असता वेबसाईटवर सर्वर प्रॉब्लेम दाखवत आहे. तसेच देवनागरी लिपीमध्ये टाईप करताना अडचण येत आहे. संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर अचानक लॉग आऊट होत असल्याने पुन्हा फॉर्म भरण्याची मेहनत घ्यावी लागते असे केंद्र चालकांनी सांगीतले.
शासनाने पोलीस भरती प्रक्रियेसाठी ज्या वेबसाईटवर उमेदवारांना अर्ज भरायचे आहेत ती साईटच व्यवस्थित चालत नसल्याने विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेऊन भरतीची तयारी केली केली. आता याच भरतीची ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी साईट चालत नसल्याने विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेवरच रात्र जागून काढावी लागत आहे.
हे ही वाचा : कंटेनर भरून खोके कुणी पचवले, एकदिवस…, एकनाथ शिदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसे उत्तर
साईट व्यवस्थित चालत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप रजिस्ट्रेशन ही झाले नाहीत तर काही विद्यार्थ्यांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे..त्यामुळे हे विद्यार्थी आता पोलीस भरतीची ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.