JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / परभणीत खळबळ! लॉकडाऊनमध्ये 370 किमी प्रवास करणारा तरुण कोरोना पॉझिटिव्ह

परभणीत खळबळ! लॉकडाऊनमध्ये 370 किमी प्रवास करणारा तरुण कोरोना पॉझिटिव्ह

ग्रीन झोनमध्ये असलेल्या परभणी जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून त्याच्या संपर्कात आलेल्या 8-9 लोकांची माहिती मिळाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

परभणी, 17 एप्रिल : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकाडऊनही करण्यात आलं आहे. कामानिमित्त शहरात राहणारे लोक अडकून पडले आहेत. यातील काहींनी चालत तर काहींनी मिळेल त्या वाहनानं कसंही करून घरी जाण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, दुचाकीवरून 370 किमी अंतर पार करत घर गाठणाऱ्या तरुणाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशामध्ये सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातील एक तरुण पुण्याहून परभणी जिल्ह्यात त्याच्या घरी पोहोचला होता. आता त्याला कोरोना झाला असल्याचं समोर आलं आहे. पुण्याहून परभणीपर्यंत 370 किमी अंतर दुचाकीवरून 21 वर्षांचा तरुण 12 एप्रिलला घरी पोहोचला. त्यानंतर तो एका नातेवाईकाच्या घरी थांबला होता. दरम्यानच्या काळात रुग्णालयात जाऊन तब्येत बरी नसल्यानं औषधही घेतल्याचं समजतं. त्यावेळी त्याच्या प्रवासाबद्दल माहिती नव्हती आणि कोरोनाची चाचणीही झाली नव्हती. त्यानंतर जेव्हा कोरोनाची लक्षणं असल्याचं जाणवलं तेव्हा परभणीच्या सरकारी रुग्णालयात त्याला दाखल कऱण्यात आलं. तरुण त्याच्या घरी पोहोचल्यानंतर कोरोनाची लक्षणं दिसू लागली होती. त्यानंतर तपासणी केली असता त्याला कोरोना झाल्याचं निदान झालं. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या 8 ते 9 लोकांची माहिती मिळाली आहे. यामध्ये जिल्ह्याच्या सीमेवर चेक पोस्टवर तैनात असलेले काही पोलिस कर्मचारी आणि इतर लोकांचा समावेश आहे. परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगलीकर यांनी सांगितलं की, जिल्ह्यांच्या सीमा बंद असतानाही तरुण पुण्याहून परभणीत पोहोचला होता. जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेल्या गस्ती पथकाला चुकवून तरुण जिल्ह्यात शिरला होता. रात्रीच्या सुमारास तो पुण्याहू निघाला आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धालेगाव इथं पहाटेच्या वेळी पोहोचला. तो परभणीचा नसून इथून 40 किमी अंतरावर असलेल्या जावला बाझार गावचा असल्याची माहितीही त्यांनी दिली. हे वाचा : ठेकेदारानं दिला निम्माच पगार, संतप्त कामगारांकडून तोडफोड तर पोलिसांवरही हल्ला तरुणाला कोरोना झाल्याचं समोर येईपर्यंत परभणी जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. आता जिल्ह्यात रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. यानंतर जिल्ह्याच्या सीमेवर असलेला बंदोबस्त आणखी कडक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गावच्या पोलीस पाटलांनाही याबाबत कळवण्यात आलं असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. हे वाचा : मुंबईकरांना मोठा दिलासा! या ‘रेड झोन’ परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या