JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / क्रिकेटच्या मैदानात झाला आयुष्याचा खेळ; गुप्तांगाला बॉल लागल्याने पंढरपुरातील तरुणाचा मृत्यू

क्रिकेटच्या मैदानात झाला आयुष्याचा खेळ; गुप्तांगाला बॉल लागल्याने पंढरपुरातील तरुणाचा मृत्यू

पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे मैदानात क्रिकट खेळत असताना गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने विक्रमच्या गुप्तांगाला जोरदार फटका लागला. यानंतर विक्रम मैदानावर खाली कोसळला

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर 07 ऑगस्ट : जिल्ह्यातील पंढरपूरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात क्रिकेट खेळणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. क्रिकेट खेळत असताना गुप्तांगाला चेंडूचा फटका लागून एका तरुणाचा जीव गेला आहे. ही घटना पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील क्रिकेटच्या मैदानात घडली. विक्रम गणेश क्षीरसागर (वय ३५) असं या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. Shocking! भरमंडपात केस खेचून फरफटत नेलं, लाथाबुक्क्यांनी तुडवलं; लग्नात नवरदेवाने घेतला नवरीचा जीव पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे मैदानात क्रिकट खेळत असताना गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने विक्रमच्या गुप्तांगाला जोरदार फटका लागला. यानंतर विक्रम मैदानावर खाली कोसळल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीनं पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालायात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यानच विक्रमचा मृत्यू झाला. तावशी येथील माणनदीच्या पात्रात क्रिकेट स्पर्धेच्या वेळी घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळं परिसरात शोककळा पसरली. गावातील क्रिकेट स्पर्धेत खेळताना विक्रम क्षीरसागर नेपातगाव या टीमकडून बॅटिंग करत होता. यावेळी समोरच्या टीमच्या वेगवान गोलंदाजने टाकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने हा चेंडू विक्रमच्या गुप्तांगाला लागला. या घटनेत विक्रमचा दुर्दैवी मृत्यू झाला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं जातं. मात्र, यावेळी लागणारी संरक्षक साधने, गार्डस या वस्तू खेळाडूंकडे नसल्याने असे प्रकार घडतात. क्रिकेट खेळताना अनेकदा तरुणांना डोक्याला मार लागणं किंवा इतर इजा होणं, अशा घटना अनेकदा समोर येत असतात. मात्र, आता समोर आलेल्या घटनेत या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या