JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Osmanabad : उस्मानाबादी रसदार गुलाबजाम, पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Osmanabad : उस्मानाबादी रसदार गुलाबजाम, पाहताच तोंडाला सुटेल पाणी

महाराष्ट्रात उस्मानाबादला इथल्या प्रसिद्ध गुलाबजाममुळे नवीन ओळख मिळत आहे. शहराला भेट देणारा प्रत्येक प्रवासी उस्मानाबादी गुलाबजामची चव घेतल्याशिवाय शहराचा निरोप घेत नाही.

जाहिरात

गुलाबजाम

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उस्मानाबाद, 05 ऑगस्ट : उस्मानाबादी बोकड आणि अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रसिद्ध आहे. मात्र, त्याचबरोबर महाराष्ट्रात उस्मानाबादला इथल्या प्रसिद्ध गुलाबजाममुळे नवीन ओळख मिळत आहे. शहराला भेट देणारा प्रत्येक प्रवासी उस्मानाबादी गुलाबजामची (Famous Osmanabadi Gulab Jamun) चव घेतल्याशिवाय शहराचा निरोप घेत नाही. लांबट आकारासाठी प्रसिद्ध असणारे उस्मानाबादचे गुलाबजाम म्हटलं की, कुठल्याही खवय्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पन्नास साठच्या दशकात शहरात राजस्थानातून आलेल्या सिंधी दुर्बिनचे गुलाबजाम प्रसिद्ध होते. नेहरू चौकात असणाऱ्या दुर्बिनच्या या हॉटेलमध्ये त्या काळात लोकनेत्यांनी, सिने कलावंत, लेखक, आणि साहित्यिक मंडळींनी या गुलाबजामचा आस्वाद घेतलेला होता. त्यामुळे सिंधी दुर्बिनच्या गुलाबजामला संपूर्ण जिल्ह्यात चांगलीच प्रसिद्ध मिळाली होती. दुर्बिनच्या प्रसिद्ध गुलाबजामची नंतर जवाबदारी सांभाळली ती उस्मान निचलकर यांनी. हेही वाचा- लहानपणी वाचा गेली पण जिद्द नाही; ग्रामीण भागातील मुक्या कलावंताची ‘बोलकी’ चित्रं उस्मानाबादी प्रसिद्ध गुलाबजाम 1980 च्या दशकात त्यांनी उस्मानाबादच्या पंचक्रोशीत गुलाबजामला लोकप्रियता मिळवून दिली. त्यांची पुढची पिढी देखील आता याच व्यवसायात कार्यरत आहे. आयाज खडके यांनी आपल्या मामाकडून प्रेरणा घेऊन त्यांच्याच मदतीने उस्मान टी हाऊसची स्थापना केली. या हॉटेल व्यवसायात स्वतःचा जम बसवला आणि मेहनतीने, परिश्रमातून हॉटेल नावारूपास आणले याच हाॅटेलात उस्मनाबादी जामुन बनतात. गुलाबजामच्या अनोख्या चवीने उस्मान टी हाऊसचीही लोकप्रियता वाढली आणि सिंधी दुर्बिनच्या गुलाबजामला आता उस्मानाबादी प्रसिद्ध गुलाबजाम म्हणून ओळखले जाऊ लागले. ताजमहाल टॉकीज समोर आठवडी बाजार उस्मानाबाद येथे हे हॉटेल उस्मान टी हाऊस या नावाने आहे. Usman Tea House गुगल मॅपवरून साभार दिवसभरात तीस किलो खवा एक किलो खव्यात जवळपास पाव किलो इतका मैदा असे जामुनचे प्रमाण असते. येरमाळा येथील प्रसिद्ध खवा उत्पादकांकडून उस्मानाबाद शहरातील जामुन उत्पादकांना दुधाचा खवा पुरविला जातो. उस्मानाबादमधील एका जामून उत्पादकांना दिवसभरात तीस किलो खवा लागतो. जवळपास 60 ते 70 लीटर दूध लागते. आचाऱ्यांना एकदा सगळी तयारी करून दिली की त्यानंतर ते हातावर मैदा आणि खवा घातलेले मिक्सर लांबट आकारात गोळे तयार करतात. हेही वाचा- खंडोबाचा थाट! Audi Q2 गाडीच्या किंमतीचे बनवले सिंहासन, Special Report 180 रुपये प्रति किलो एका लांबट गुलाबजामचे अंदाजे वजन 50 ग्रॅम इतके राहते. नंतर ही सर्व सामग्री तेलात तळून काढली जाते. तळून काढताना विशेष लक्ष दिले जाते की, त्यांचा ठरावीक तपकिरी रंग आहे तो रंग या सर्व गोळ्यांना आला पाहिजे. त्यानंतर साखरेच्या पाकात केलेल्या चाचणीमध्ये ही सर्व सामग्री बुडवून ठेवली जाते. एका किलोमध्ये अंदाजे वीस गुलाबजाम येतात आणि त्याच्यासोबत पाक असतो. 180 रुपये प्रति किलो प्रमाणे येथील गुलाबजाम विकले जातात, अशी माहिती हॉटेल व्यावसायिक आयाज खडके (संपर्क क्रमांक 9096443337) यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या