JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महिला भक्ताचा विनयभंग, 45 दिवस फरार, अखेर लोमटे महाराजाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

महिला भक्ताचा विनयभंग, 45 दिवस फरार, अखेर लोमटे महाराजाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

आरोपी लोमटे महाराजाने महिलेला शरीर संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत भक्त महिलेचा विनयभंग केला होता. आरोपीने अशा पद्धतीने आणखी किती महिलांचा विनयभंग केला याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडी मागितल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात

दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजाविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उस्मानाबाद, 15 सप्टेंबर : उस्मानाबाद जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. स्वयं घोषित एकनाथ लोमटे महाराज यास कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कळंब प्रथम वर्ग न्यायालयाने लोमटे महाराजाला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लोमटे महाराजला भक्त महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कळंब पोलिसांनी अटक केली होती. विशेष म्हणजे महाराज 45 दिवस फरार होता. आरोपी लोमटे महाराजाने महिलेला शरीर संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत भक्त महिलेचा विनयभंग केला होता. आरोपीने अशा पद्धतीने आणखी किती महिलांचा विनयभंग केला याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडी मागितल्याची माहिती समोर आली आहे. दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजाविरोधात 28 जुलै 2022 रोजी पीडित भक्त महिलेनं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लोमटे महाराजा विरोधात येरमाळा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच लोमटे महाराज फरार झाला होता. अखेर 45 दिवसांनंतर कळंब पोलिसांनी लोमटे महाराजाला काल सकाळी अटक केली होती. कळंब तालुक्यातील मलकापूर येथे लोमटे महाराजाचा मठ आहे. आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्ताला बरे करतात अशी महाराज यांची ख्याती आहे. ( ‘सैराट’मधला प्रिन्स खऱ्या आयुष्यातही निघाला ‘खलनायकच’, लवकरच अटक होणार ) महाराज यांचा राज्यभर मोठा भक्तवर्ग असून या मध्ये विविध पक्षांचे बडे नेते ही महाराज यांचे भक्त आहेत. भक्त महिलेच्या विनयभंग प्रकरणात लोमटे महाराज याला अटक झाल्याने धार्मिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, लोमटे महाराजांन किती महिला भक्तांची फसवणूक केली हे तपासात उघड होईल, असं पोलिसांनी सांगितलं. लोमटे महाराजा याच्यावर या पूर्वीही जादूटोणा व लोकांना फसवल्याचे गुन्हे दाखल आहेत. लोमटे महाराजाविरोधात यापूर्वी भोंदूगिरी करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. याच महाराजाने महिला दर्शनासाठी आली असता तिचा विनयभंग केला. इतकच नाही तर मी तुला गुंगीचं औषधं देऊन तुझ्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ देखील शूट केल्याची धमकी देखील लोमटे महाराजाने पीडित महिलेला दिल्याची माहिती समोर आली. या पीडितेच्या तक्रारीवरून लोमटे महाराजांवर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच लोमटे महाराज फरार झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या