JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'त्याला कुठून अवदसा सुचली आणि...', सासुरवाडीतच अजितदादांनी भाच्यावर डागली तोफ

'त्याला कुठून अवदसा सुचली आणि...', सासुरवाडीतच अजितदादांनी भाच्यावर डागली तोफ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे त्यांची सासुरवाडी उस्मानाबादच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी थेट आपल्या भाच्यावरच निशाणा साधला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उस्मानाबाद, 1 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे त्यांची सासुरवाडी उस्मानाबादच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी थेट आपल्या भाच्यावरच निशाणा साधला. उस्मानाबादच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी त्यांचा भाचा आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका केली. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्या मनात पद्मसिंह पाटील यांच्या बंडाळीचं शल्य आजही पवार कुटुंबियांच्या मनात सलतंय, असं दिसून आलं. ‘राणा पाटलाला अवदसा सुचली आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडली, त्याला काय कमी केलं होतं,’ असं अजित पवार म्हणाले आहेत. आपल्या सासुरवाडीमध्ये आल्यानंतर अजित पवार पाटील कुटुंबियांबाबत काय बोलणार, याबाबत सगळ्यांमध्ये उत्सुकता होती. उमरगा शहरातील भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या कार्यक्रमात अजितदादांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका केली. काय आहे नातं? पद्मसिंह पाटील आणि पवार कुटुंब यांच्यात जवळचं नातं आहे. पद्मसिंह पाटील यांच्या बहिण सुनेत्रा पवार यांचं अजित पवारांशी लग्न झालं आहे. राणा जगजितसिंह हे पद्मसिंह पाटील यांचे पूत्र आहेत. 2019 निवडणुकीआधी राणा जगजितसिंह यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पद्मसिंह पाटील हे बराच काळ शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे होते. पद्मसिंह पाटील आणि शरद पवार यांच्या या जवळीकीचं रुपांतरच नंतर पाटील-पवार कुटुंबियांच्या नात्यात झालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या