JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान मोठी दुर्घटना; कोल्हापूरमधील राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू

सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान मोठी दुर्घटना; कोल्हापूरमधील राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू

सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेतील एका स्पर्धकाचा मृत्यू झाला आहे. राज पटेल असं या स्पर्धकाचं नाव आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा 18 सप्टेंबर : सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी साडे सहा वाजता सुरुवात झाली. मात्र, आता या ठिकाणाहून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेतील एका स्पर्धकाचा मृत्यू झाला आहे. राज पटेल असं या स्पर्धकाचं नाव आहे. हा स्पर्धक कोल्हापूरमधील राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू होता. मृत स्पर्धकाला सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान या धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. स्पर्धेत धावणारा संबधित स्पर्धक हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील होता. राज ठाकरे विदर्भात पोहोचले, विदर्भात भाजपला देईल का मनसे टक्कर?

या स्पर्धेत देशभरातील तब्बल 7500 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. देश विदेशातून अनेक स्पर्धक या मॅरेथाॅनमध्ये सहभागी होतात. ही स्पर्धा नियोजनबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सातारा रनर्स फाऊंडेशनच्यावतीनं स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांना पाणी, औषधं, बिस्कीटं, वेदनाशामक स्प्रे, कुलिंग स्टेशन इत्यादीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, राज पटेल नावाच्या स्पर्धकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे

या स्पर्धेत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी फूड पॅकेट्सचीही व्यवस्था करण्यात आली असते. त्याशिवाय स्पर्धेच्या मार्गावर जर एखाद्या स्पर्धकाला जर काही त्रास झालाच तर त्या स्पर्धकाला त्वरित प्रथमोपचार कसा करता येईल अशा प्रकारचे प्रशिक्षण सर्व स्वयंसेवकांना देण्यात येतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या