JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कारची एकच धडक, ट्रॅक्टरचे झाले 3 तुकडे, 2 चिमुरडे थोडक्यात बचावले, VIDEO

कारची एकच धडक, ट्रॅक्टरचे झाले 3 तुकडे, 2 चिमुरडे थोडक्यात बचावले, VIDEO

या ट्रॅक्टरमध्ये 5 लोक बसून होते. यामध्ये 2 चिमुकल्यांच्या सुद्धा समावेश होता. परंतु, सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

जाहिरात

या ट्रॅक्टरमध्ये 5 लोक बसून होते. यामध्ये 2 चिमुकल्यांच्या सुद्धा समावेश होता. परंतु, सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गडचिरोली, 19 नोव्हेंबर : गडचिरोली जिल्ह्यामध्ये कार आणि ट्रॅक्टरचा विचित्र अपघात झाला. या भीषण अपघातात ट्रॅक्टरचे अक्षरश: 3 तुकडे झाले. या भयावह अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोरची मुख्यालयापासून अंदाजे 15 ते 16 किमी अंतरावर आलेवाडा परिसरात हा अपघात झाला.  मुरारी कुंजाम राहणार बेतकाठी येथील शेतकरी स्वतःच्या मालकीचे धान्य भरून येत होता. त्यावेळी अचानक समोरून भरधाव वेगाने येणारा कारने जोराची धडक दिली. भरधाव कारच्या धडकेनंतर ट्रॅक्टरचे अक्षरश: 3 तुकडे झाले. इंजिन एका बाजूला तर मधल्या भागाचे दोन तुकडे झाले.

या ट्रॅक्टरमध्ये 5 लोक बसून होते. यामध्ये 2 चिमुकल्यांच्या सुद्धा समावेश होता. परंतु, सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. ट्रॅक्टरमध्ये असलेल्या राकेश नैताम बेतकाठी यांना छातीला आणि पायामध्ये दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे. (मद्यधुंद शिक्षकाचा प्रताप; कारची अनेक गाड्यांना धडक, पादचाऱ्यांनाही उडवलं, नाशकातील घटनेचा VIDEO) एक चूक अन् कार पुलावरून थेट रेल्वे रुळावर दरम्यान, अमरावतीमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. क्लच ऐवजी एक्सलेटरवर पाय पडल्याने चक्क पुलावरून कार रुळावर आदळल्याची घटना धामणगाव रेल्वे स्थानकावर घडली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

अमरावतीमध्ये धामणगाव रेल्वे स्थानकावर आज सकाळी ही घटना घडली. रेल्वे स्टेशनला लागून कर्मचाऱ्यांची घरं आहे. एका घरासमोरून कार काढत असताना त्या कर्मचाऱ्याचा ब्रेक ऐवजी एक्सलेटरवर पाय पडला. (Wild Animals : सांबर पोहोचलं चहाच्या टपरीवर! आयएफएस अधिकाऱ्यानं शेअर केला व्हिडिओ) मग काय, कार अनियंत्रित झाली आणि पुलाचा कठडा तोडून कार थेट रेल्वेच्या रुळावर येऊन आदळली. ही कार चक्क प्लॅटफॉर्मवरून हवेत उडी घेत रेल्वे रुळावर आदळली. सुदैवाने यावेळी मुंबई नागपूर रेल्वे मार्गावर कोणत्याही प्रकारची गाडी नसल्याने मोठा अनर्थ टळला. हा थरार अनेकांनी अनुभवला. एखाद्या सिनेमात शोभावा असा हा थरारक प्रसंग अमरावतीकरांनी अनुभवला. वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कार बाजूला केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या