JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO : सकाळपासून बत्ती गुल झाल्याने अख्खी पनवेल अंधारात, नागरिक त्रस्त

VIDEO : सकाळपासून बत्ती गुल झाल्याने अख्खी पनवेल अंधारात, नागरिक त्रस्त

राज्यात आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वीज भारनियमन केले जात आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रमोद पाटील, प्रतिनिधी पनवेल, 6 सप्टेंबर : पनवेल शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वीज भारनियमन सुरु असल्याचा आरोप याचवर्षी मे महिन्यात मनसे नेत्यांनी केला होता. तसेच या भारनियमनाच्या विरोधात मनसेच्या नेत्यांनी आंदोलनही केले होते. यात आत आणखी बातमी समोर आली आहे. मंगळवारी संपूर्ण दिवसभर अख्खी पनवेल अंधारात होते. वीज नसल्याने शहरात सकाळपासून लाईट नव्हती. यामुळे भारनियमन सुरू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पनवेल शहरात संपूर्ण दिवसभर लाईट नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भर गणपती उत्सवात लाईट गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीतही MSEB कडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांना अंधार तसेच लाईटविना राहावे लागले आहे. संपूर्ण पनवेल शहरात वीज नसल्याने रस्त्यांवर अंधारमय परिस्थिती पाहायला मिळते आहे.

संबंधित बातम्या

मे महिन्यात मनसेने केले होते आंदोलन - राज्यात आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वीज भारनियमन केले जात आहे. त्याचप्रमाणे पनवेल शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वीज भारनियमन सुरु असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी मे महिन्यात केला होता. तसेच पनवेल शहरामध्ये चार ते पाच तास वीज भारनियमन केले जात होते.  मात्र, महावितरणाच्या कार्यालयामध्ये कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता. महावितरणच्या कार्यालयामध्ये जाब विचारण्यासाठी मनसे नेते गेले असता तिथे कोणताही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे मनसेच्या नेत्यांनी महावितरण कार्यालयासमोर उन्हात बसून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले होते. हेही वाचा -  बाप्पा वाचव रे! मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे कोकणातील चाकरमानी वैतागले! दरम्यान, आता आज मंगळवारी ही परिस्थिती ओढवल्याने नागरिकांना वीज नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या