JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री 'बिझी', मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पुन्हा टळला!

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री 'बिझी', मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पुन्हा टळला!

महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन 22 दिवस उलटून गेले आहेत. या दोघांनीही 30 जूनला मंत्रिपदाची शपथ घेतली, पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जुलै : महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन 22 दिवस उलटून गेले आहेत. या दोघांनीही 30 जूनला मंत्रिपदाची शपथ घेतली, पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरूवात केली आहे. सुप्रीम कोर्टाकडून सरकारवर टांगती तलवार असल्यामुळे मंत्र्यांचे शपथविधी होत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे, पण एकनाथ शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. राज्यातल्या काही भागांमध्ये पूरस्थिती असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याची टीकाही विरोधकांनी केली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करू, असं वारंवार सांगत आहेत पण याला मुहूर्तच मिळत नाहीये. शिंदे गट आणि भाजपकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत. त्यातच आता मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी चार ते पाच दिवस टळला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 23 जुलैला भाजपची प्रदेश कार्यकारिणी आहे, तर 24 जुलैला राज्यभर आदिवासी पाड्यांवर भाजपकडून जल्लोष करण्यात येणार आहे. 25 जुलैला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत, त्यामुळे शिंदे सरकारचा विस्तार 26-27 जुलैपर्यंत होण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान राज्य सरकारचं अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा शिंदे सरकारचा विचार आहे, त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. दुसरीकडे राज्यात घडलेलं सत्तानाट्य आणि झालेला शपथविधी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात 1 ऑगस्टला पुढची सुनावणी होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या