तुळजाभवानी देवीच्या मंदिरातच नितेश राणे यांनी राष्टवादीवर अश्लील भाषेत टीका केली आहे.
सिंधुदुर्ग, 1 फेब्रुवारी: शिवसैनिक संतोष परब मारहाण प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) मोठा झटका बसला आहे. आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurg District session court) फेटाळला आहे. आता नितेश राणे हे उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. उच्च न्यायालयात नितेश राणे आपला जामीन अर्ज दाखल करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या (Sindhudurg District Central Co operative Bank Election) रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत (Satish Sawant) यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अटकेपासून त्यानंतर नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांची मुभा दिली होती. त्यानंतर नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजर होत आपला जामीन अर्ज दाखल केला होता. वाचा : शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरण: नितेश राणेंचा पीए राकेश परब कणकवली पोलिसांना शरण काल काय घडलं होतं कोर्टात? सोमवारी (31 जानेवारी 2022) नितेश राणे यांच्या वकील संग्राम देसाई आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यात जोरदार युक्तीवाद झाला. संग्राम देसाई यांनी पोलिसांनी तपासात काही मुद्दे उपस्थित केले. पोलीस बोलतायेत की नितेश राणे यांच्याकडे 7 मोबाईल नंबर आहेत पण फक्त 3 मोबाईल नंबर पोलिसांनी तपास अहवालात दिले. त्यातील एक नंबर ज्याचा नितेश राणे वापर केला असं पोलीस बोलत आहे. तो नितेश राणे यांनी 7 वर्षांपूर्वीच वापरायचे बंद केले. तो कोणाला तरी तिऱ्हाईत व्यक्तीला वोडाफोन कंपनीने दिला आहे त्याचा अहवाल कोर्टात सादर करतो. मोबाईल फोन नितेश राणे स्वतः डिसेंबर महिन्यात घेवून गेले होते, अशी माहिती देसाईंनी न्यायालयात दिली. तसंच, ‘राणेंवर 353 च्या तीन केसेस आहेत. मालवण बांगडा फेक आंदोलन, इंजिनिअरच्या चेहऱ्याला काळे फासणे आणि डंपर आंदोलन या व्यतिरिक्त कोणतेही गुन्हे नाहीत, हे सर्व जनतेसाठी आंदोलन करताना झालेले गुन्हे आहेत, असा युक्तीवाद देसाई यांनी केला. माझ्याकडे व्हॅन नाही. ज्या व्हॅन मध्ये कट रचला असं पोलिस तपासात बोललं जातय ती व्हॅन माझी नाही. माझ्याकडे कोणतेही शस्र नाही. माझे मोबाईल मी पोलिसांना दाखवले होते त्यामुळे माझ्या कोठडीची गरज नाही, असं राणेंच्या वतीने देसाई यांनी कोर्टात सांगितले. काय आहे प्रकरण? शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे. या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत हवे आहेत, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टानं नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.