पुणे,22 फेब्रुवारी: ‘झी मराठी’वरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका चर्चेत असताना या मालिकेवरून नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील संभाजी महाराजांच्या हत्येचे भाग वगळणार असल्याचा दावा शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी केला होता. मात्र, त्यावर खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी खुलासा केला आहे. काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे? मुळात गेली 2.5 वर्षे मालिका सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे. परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी ‘झी मराठी’ वाहिनीचा असेल. संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे भाग प्रदर्शित करू नये, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली होती. अखेर स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील संभाजी महाराजांच्या हत्येचा भाग वगळणार असल्याचे आश्वासन डॉ.अमोल कोल्हे यांनी दिले असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले आहे. मात्र, आपण असे बोललो नसल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.
वयाच्या 80 नंतर आता रोल बदललाय, शरद पवारांनी दिले नव्या भूमिकेचे संकेत दरम्यान, स्वराज्यरक्षक संभाजी मालिका आता अखेरच्या टप्प्यात आहे. मालिकेत संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केल्याचे दाखवण्यात येत आहे. त्यानंतरची दृश्यं पाहमे मनाला पटणारं नाही, या मालिकेतील असे चित्रीकरण रोखता येईल काय, याबद्दल निर्माते तसेच मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं खोतकरांनी सांगितलं होतं. दरम्यान, संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने छळ करून त्यांना यातना देण्यात आल्या त्या पाहणे आम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू शकण्याची भीतीही अर्जुन खोतकरांनी व्यक्त केली होती. शरद पवारांनी केलं CM उद्धव ठाकरेंचं तोंड भरून कौतुक, म्हणाले…