JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / COVID-19: महाराष्ट्रात रुग्ण संख्या 50 लाखांजवळ, 10 जिल्ह्यांत ग्रोथ रेटमध्ये घसरण झाल्याने दिलासा

COVID-19: महाराष्ट्रात रुग्ण संख्या 50 लाखांजवळ, 10 जिल्ह्यांत ग्रोथ रेटमध्ये घसरण झाल्याने दिलासा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, असा अंदाज आहे, की 11 जिल्ह्यांत 16 मेपर्यंत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 मे : देशभरात कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 54 हजारहून अधिक नवे कोरोनाग्रस्त आढळले असून 898 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मागील अनेक दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजारांवर आहे, नव्या आकड्यांसह राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 49 लाख 89 हजार 758 इतकी झाली आहे. आतापर्यंत 74 हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. परंतु आता महाराष्ट्रासाठी चांगली बाब म्हणजे राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये ग्रोथ रेट कमी झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असा अंदाज आहे, की 11 जिल्ह्यांत 16 मेपर्यंत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. www.covid19india.org च्या आकड्यांनुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 3 हजारहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तसंच गेल्या 24 तासात औरंगाबादमध्ये 988 आणि ठाण्यात 2,274 रुग्णांची नोंद झाली आहे. औरंगाबाद येथील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये आतापर्यंत 2,709 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 1,19,117 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्या जिल्ह्यात 9,010 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

(वाचा -  कोरोनामध्ये माणुसकीचं दर्शन घडवतोय हा तरुण; दररोज 100 कोरोनाग्रस्तांना मोफत जेवण )

औरंगाबादमध्ये आतापर्यंत 9,85,461 चाचण्या झाल्या आहेत. तसंच औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी शुक्रवारी बालरोग तज्ज्ञांशी बैठक घेऊन मुलांमध्ये होणाऱ्या संक्रमणास सामोरं जाण्याच्या मार्गांवर चर्चा केली. ठाणे जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या आतापर्यंत 4,84,769 झाली आहे. तर मृतांचा आकडा 7,935 वर गेला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात कोरोना मृत्यूदर 1.63 टक्के आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या