JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शरद पवारांनी CBIवर साधला निशाणा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया

शरद पवारांनी CBIवर साधला निशाणा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया

दाभोलकर आणि सुशांत सिंह यांच्या CBI तपासावर काय म्हणाले शरद पवार?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 ऑगस्ट : सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणी सर्व स्तरातून CBI चौकशीची मागणी केली जात होती. त्यानंतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुढील तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अज्ञानाधारित शोषणाविरूद्ध कडवी झुंज देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा तपास 2014 पासून CBI करत आहे. मात्र अद्याप योग्य न्याय मिळाला नाही. हीच बाब सुशांत सिंह रजपूत प्रकरणात घडणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे. ‘मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय मार्फत 2014 मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही.’

‘सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल.’ 2014 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली होती. मात्र अद्यापही योग्य न्याय न मिळाला नाही. याची पुनरावृत्ती होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. हे वाचा- सुशांत मृत्यू प्रकरणाचा हे 4 अधिकारी करणार तपास; CBI ने SIT टीम केली जाहीर

संबंधित बातम्या

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज पुण्यस्मरण दिन आहे. त्यानिमित्तानं शरद पवार यांनी ट्वीट करून अभिवादन केलं आहे. दाभोलकरांनी अंधश्रद्धेविरोधातात, अनिष्ठ रुढींविरोधात आवाज उठवला होता.

जाहिरात

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास पूर्ण करावा या मागणीसाठी अनिसनं आंदोलन केलं आहे. विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अनिसनं हातात दाभोलकरांचे पोस्टर घेऊन आंदोलन केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या