JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जितेंद्र आव्हाडांना आज जामीन मिळण्याची शक्यता, 'ही' कारणं आली समोर

जितेंद्र आव्हाडांना आज जामीन मिळण्याची शक्यता, 'ही' कारणं आली समोर

जितेंद्र आव्हाड यांना आज 11:30 सुमारास कोर्टात हजर केले जाणार आहे. दुपारी लोकअदालत असल्यानं पहिल्या सत्रातच हजर करणार आहे

जाहिरात

जितेंद्र आव्हाड यांना आज 11:30 सुमारास कोर्टात हजर केले जाणार आहे. दुपारी लोकअदालत असल्यानं पहिल्या सत्रातच हजर करणार आहे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 12 नोव्हेंबर : हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडत असताना मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. पण, या प्रकरणात त्यांना आजच जामीन मिळण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांना आज 11:30 सुमारास कोर्टात हजर केले जाणार आहे. दुपारी लोकअदालत असल्यानं पहिल्या सत्रातच हजर करणार आहे. वर्तक नगर पोलीस ठाण्यातून थेट कोर्टात नेलं जाणार आहे. शुक्रवारी वैद्यकीय तपासणी केली असल्याने ती 48 तास वैध असते म्हणून आज मेडिकल करण्याची आवश्यकता नाही. (सेनेला रोखण्यासाठी केसरकर-राणे आले एकत्र, सिंधुदुर्गात ‘या’ निवडणुकीत दिली विजयी सलामी) सिनेमा गृहात मारहाण झालेल्या मनसेचा कार्यकर्ता धुर्वे यांच्या फिर्यादीवरून जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्यासह 12 जणांना अटक केली आहे. या सर्व 12 आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे. या गुन्ह्यांच्या तपासकामी पोलीस कोठडीची मागणी करणार आहे. तपासात सहकार्य केलं नाही, उत्तरं देण्यास टाळाटाळ, या चित्रपटावर आक्षेप होता तर योग्य कायदेशीर दाद का नाही मागितली? याचा अर्थ हेतू हा सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न आहे का? राज्यातील अनेक सिनेमागृहात सुरू असलेला हा सिनेमा, बंद पाडण्याचं,कारस्थान आहे का? याचा तपास करायचा आहे. प्रेक्षकगृहातील प्रेक्षकांची सुरक्षा धोक्यात आणण्याचे कटकारस्थान आहे, त्याचा सखोल तपास करायचा आहे. (नाशिकने वाढवलं शिंदेंचं टेन्शन! दादा भुसेंच्या बैठकीला सुहास कांदेंची दांडी) मॉलमधील चित्रपटगृह चालक यांचे व्यावसायिक नुकसान केले आहे. आरोपींवर इतर गुन्ह्यांचीही नोंद आहे. राजकीय पक्षाचे नेते आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्यानं, हा गुन्हा करण्यामागील मानसिकता काय ? याचा तपास करायचा आहे. काय होऊ शकतं कोर्टात ? पोलीस,जितेंद्र आव्हाड यासह 12 जणांची पोलीस कोठडी मागतील. मात्र, अशा आंदोलन गुन्ह्यात पोलीस कोठडी दिल्या गेल्याचा इतिहास फार कमी असल्याने कोर्ट देऊ शकते न्यायालयीन कोठडी देईल. जर न्यायालयीन कोठडी (MCR) दिली तर लागलीच जामिनासाठी अर्ज सादर केला जाऊ शकतो मालमत्ता नुकसान नसल्यानं,जामीन मंजूर होण्याची शक्यता अधिक आहे. असं होण्याची शक्यता असल्यानं आजच जितेंद्र आव्हाड,आनंद परांजपे यासह सर्व 12 आरोपींना मुक्त होतील. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांवर अधिकची कलमं लावण्यात आली आहे. 141,143,146,149,323 यासह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) 135 यासह कलम 7 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या