JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आठवडाभरापासून एकनाथ खडसेंवर मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु, प्रकृती स्थिर

आठवडाभरापासून एकनाथ खडसेंवर मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु, प्रकृती स्थिर

त्यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून बॉम्बे रुग्णालयात (Bombay Hospital) उपचार सुरु आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 ऑगस्ट: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)रुग्णालयात (Hospital)दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून बॉम्बे रुग्णालयात (Bombay Hospital) उपचार सुरु आहेत. टीव्ही 9 मराठीनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. ईडीची पिडा एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांची गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरु आहे. भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे (bhosari land scam)एकनाथ खडसे वादात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी ( ED arrests Girish Chaudhary) यांना अटक केली होती. त्यानंतर खडसेही ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते. पुण्यात गॅरेजला लागलेली भीषण आग पहाटे आटोक्यात, दोघांवर उपचार सुरू गेल्या महिन्यात ईडीसमोर चौकशीला सामोरं जाण्याआधी एकनाथ खडसेंनी एक खळबळजनक आरोप केला होता. ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली होती. तसंच भाजप सोडल्यापासून माझ्यामागे चौकशी लावली जात आहे. या चौकशीवर मला संशय येत आहे. संशय येण्यामागे पण एक कारण आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगावमधील काही Whatsapp ग्रुपवर कुछ तो होनेवाला है, असा मॅसेज फिरत आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास देण्याचा हा प्रयत्न असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या