नाशिक 20 ऑगस्ट : आयुर्वेदामध्ये ( Ayurveda ) गायीच्या तुपाला (Ghee) विशेष महत्त्व आहे. बुध्दीवर्धक, शक्तीवर्धक, आयुष्यवर्धक, रोगनिवारक, कुर्मीनाशक असे विविध फायदे गायीच्या तुपापासून होतात. त्यामुळे गायीचे तूप खाण्याकडे अनेक नागरिकांचा कल असतो आणि हेच गाईच्या तुपाचे महत्व लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील नायडोंगरी गवळीवाडा ( Naydongri ) येथील दहा महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून एकत्र येत गायीच्या तुपाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चला तर मग या स्पेशल रिपोर्ट मधून त्यांच्या तूप व्यवसायाबद्दल जाणून घेऊया… अशी झाली व्यवसायाची सुरुवात नांदगाव तालुक्यातील नायडोंगरी गवळीवाडा येथील दहा महिलांनी एकत्र येत बचतगटाच्या माध्यमातून हा तूप व्यवसाय सुरु केला आहे. या सर्व महिला शेतकरी आहेत. त्यांना कोणताही रोजगार मिळत नव्हता शेतीवर घर चालवणेही भागत नव्हते. त्यामुळे काही तरी व्यवसाय सुरू करू असा या महिलांनी विचार केला. मात्र व्यवसाय सुरू करायचा म्हणजे भांडवल लागत आणि ते भांडवल या महिलांकडे नव्हते. या दहा महिलांमध्ये मनिषा सोनवणे यांनी विचार केला की आपण असा कोणता व्यवसाय सुरू करू शकतो की ज्याला भांडवल नाही लागणार जो व्यवसाय आपल्या घरच्या वस्तूंवर आपल्या मेहनतीवर सुरू होऊ शकतो. त्यांनी ठरवलं की आपण गायीच्या तुपाचा व्यवसाय सुरु करू घरच्या घरी तूप बनवू आणि लोकांना शुद्ध तूप देऊ. कारण बाजारात सद्या भेसळयुक्त तूप मिळत त्यामुळे नागरिकांना चांगल्या दर्जाचे तूप मिळणे आवश्यक आहे. मनिषा सोनवणे यांनी दहा महिलांना एकत्रित करत सप्तशृंगी नावाने बचत गट स्थापन केला आणि त्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला. तुपाला सर्वच ठिकाणाहून मागणी असल्याने त्यांना यात चांगला नफा मिळत आहे. हेही वाचा :
Nashik : अंध असूनही इतरांना करतात मदत, आजवरचा प्रवास वाचून वाटेल अभिमान
मिळतोय चांगला नफा शेतकरी असल्याने सर्वच महिलांकडे घरी गायी आहेत. त्या दुधाची बाहेर विक्री न करता घरी तूप बनवतात. घरचं दूध असल्यामुळे बाहेरून काहीही आणावे लागत नाही आणि बाहेर जाण्याचा खर्च ही वाचतो. त्यामुळे महिलांना चांगला फायदा होत आहे. महिन्याकाठी 50 ते 60 हजार रुपये त्यांना मिळतात. तर वर्षांकाठी त्यांना लाखोंची कमाई होत आहे. 650 रुपये किलोने गायीच्या तुपाची त्या विक्री करतात बाजारातील दरापेक्षा त्या कमी दरात विकतात. गायीचे शुद्ध तूप या तुपाची खास वैशिष्ट्य म्हणजे हे तूप शुद्ध असते. यात कोणतीही भेसळ केली जात नाही किंवा भेसळयुक्त पदार्थांचा वापर केला जात नाही. गायीच्या दुधापासून हे तूप बनवलं जात तूप कितीही दिवस राहिले तरी त्याचा वास येत नाही आणि खाण्यासाठी ही चविष्ट असते. कोणतीही रासायनिक प्रक्रिया तुपावर केली जात नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांची ओढ असते.
कुठे मिळत गायीचे शुद्ध तूप नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील नायडोंगरी जवळील गवळीवाडा येथे मिळते. सप्तशृंगी बचतगट हे तूप तयार करते. अधिक माहितीसाठी 93567 20918 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. हेही वाचा :
Nashik : नाशिकच्या शेतकऱ्यानं राबवला इस्रायलचा पॅटर्न; होतीय लाखोंची कमाई, पाहा VIDEO
महिलांना मिळाला रोजगार ग्रामीण भागात आम्हाला फक्त शेतीची काम करावी लागतात शिक्षण नाही. त्यामुळे कुठेही नोकरी लागायचा विषय नाही .त्यामुळे आमचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर चालतो. मात्र आम्ही बचतगटाच्या माध्यमातून गायीच्या तुपाचा व्यवसाय सुरू केला. यामुळे आमच्या हाताला काम मिळाले. आम्हाला चांगला फायदा होत आहे, अशी प्रतिक्रिया मीनाबाई लगडे यांनी दिली आहे. आम्ही सुरू केलेल्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला चांगला नफा यातून मिळाला. दूध आमचं घरचं आहे त्यामुळे फक्त मेहनत आम्हाला करावी लागते. ती मेहनत आम्ही घेतो. दहा महिला आहेत. सर्वच मिळून मिसळून काम करतात, अशी प्रतिक्रिया कमल सोनवणे यांनी दिली आहे.